शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Indian Navy: सरखेल, गोलंदाज, सागरवीर..., मोदींच्या घोषणेनंतर नौदलात अशी असतील पदांची नावं 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 2:16 PM

Indian Navy: काल झालेल्या नौदल दिन सोहळ्याला उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदल आता आपल्या रँकची नावं भारतीय परंपरांच्या अनुरूप ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.

यावर्षीचा नौदल दिन सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये साजरा झाला. यावेळी नौदलानं विविध प्रात्यक्षिकं दाखवत आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. दरम्यान, या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदल आता आपल्या रँकची नावं भारतीय परंपरांच्या अनुरूप ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही ब्रिटिश रँक्स बदलणार असून, त्याजागी भारतीय नावं ठेवणार असल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी नरेंद्र मोदींनीछत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वराज्याच्या नौदलातील कान्होजी आंग्रे, मायाजी नाइक भटकर आणि हिरोजी इंदूलकर यांनाही नमन केलं. 

मोदींनी केलेल्या घोषणेनंतर भारतीय नौदलाचे ज्युनियर आणि नॉन कमिशन्ड रँक्सची नावं आधी बदलली जाऊ शकतात. यामध्ये मास्टर चीफ पेटी ऑफिसर फर्स्ट क्लास, मास्टर चीफ पेटी ऑफिसर सेकंड क्लास, चीफ पेटी ऑफिसर, पेटी ऑफिसर, लिडिंग सीमॅन, सीमॅन फर्स्ट क्लास आणि सीमॅन सेकंड क्लास ही नावं बदलली जाऊ शकतात. त्याचा परिणाम नौदलाच्या ६५ हजार नौसैनिकांवर पडणार आहे. मात्र अधिकाऱ्यांची नावं सध्यातरी आहेत तशी ठेवली जाऊ शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशा प्रकारची नावं बदलली जाणार याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र त्यासाठी दोन प्रकारचे ट्रेंड फॉलो केले जाऊ शकतात. पहिला म्हणजे अग्निवीर आणि वायूवीर याप्रमाणे जलवीर, समुद्रवीर किंवा सागरवीर अशी नावं दिली जाऊ शकतात. दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमारामध्ये जी पदनामं होती त्यांच्या आधारावर भारतीय नौदलाची नावं बदलली जाऊ शकतात. 

मराठा आरमारामध्ये कुठल्या पदांना काय म्हणायचे त्याची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे. महा-नौसेनाध्यक्ष/Grand Admiral - सरखेल किंवा सरसुभेदार. हे पद १६९८ नंतर कान्होजी आंग्रे यांना देण्यात आलं होतं. मराठा आरमारातील सर्व पदनामं ही छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली होती. नौसेनाध्यक्ष/अॅडमिरल - सुभेदार सीनियर कॅप्टन-कोमोडोर - सरदार

कनिष्ठ स्तरावरील नौसैनिकांची तीन कॅडरमध्ये विभागणी करण्यात आली होती.खलाशी - Sailorsशिपाई  - Soldiersगोलंदाज - Gunners

सेरल रँक याप्रमाणे होते चीफ पेटी ऑफिसर - सरतांडेल, हा जहाजाचा कॅप्टन किंवा मास्टर होता.पेटी ऑफिसर - तांडेल, हा जहाजाच्या क्रूचा लीडर होता.नेव्हिगेटर - सारंग, हा तांडेल पदाच्या बरोबरीचा असे.  मरीन रँकमध्ये दोन कॅडरकार्पोरल - नाईक सोल्जर - शिपाई  मराठा नौदलामध्ये गनर म्हणजेच गोलंदाजाचं मूल्य सर्वाधिक होतं. कनिष्ठ रँक्समध्ये त्याला जहाजावर सर्वाधिक पगार मिळत असे. त्यावेळी सन १७८२-८३ च्या आर्थिक वर्षात खलाशाचा पगार ६१.५ रुपये प्रतिवर्ष होता. शिपायाचा पगार ६५ रुपये प्रतिवर्ष आणि गोलंदाजाचं वेतन ६७.८ रुपये प्रतिवर्ष होता.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदी