शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात दिसणार 'मेड इन इंडिया'ची ताकद! ६ पाणबुड्यांसाठी ५० हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 13:27 IST

भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.

भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून हा प्रकल्प रखडला होता. पण आता त्यास गती मिळणार आहे. 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नौदलासाठी ६ पाणबुड्या निर्मिती कऱण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पाणबुड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असणार असून त्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकवर केली जाणार आहे. पाणबुडीच्या निर्मितीचं काम माझगाव डॉक लिमिटेड आणि एल अँड टी कंपनीला देण्यात आलं आहे. 

नेमका प्रकल्प काय?समुद्रातील ताकद वाढविण्यासाठी भारतीय नौदलानं 75-I हा प्रकल्प हाती घेतला आहे. यात ६ दमदार पाणबुड्यांची निर्मिती केली जाणार आहे. या पाणबुड्या डिझेल आणि इलेक्ट्रीक असणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे यांचा आकार सध्याच्या स्कॉर्पिअन क्लास पाणबुडीपेक्षाही पाच पटींनी मोठा असणार आहे. 

भारतीय नौदलानं या नव्या पाणबुड्यांच्या निर्मिताबाबत ठेवलेल्या मागणीनुसार यात हेवीड्युटी फायरपावर सुविधा असणं अपेक्षित आहे. भारताकडे सध्या एकूण १४० युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. तर पाकिस्तानकडे फक्त २० युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. मात्र चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारताला समुद्र क्षेत्रात अधिक ताकदवान होण्याची गरज असल्यानं येत्या काळात नौदलाची ताकद वाढविण्याची योजना भारतानं केली आहे.  

टॅग्स :indian navyभारतीय नौदलRajnath Singhराजनाथ सिंह