शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांना भेटताच हमीदच्या अश्रूंना फुटला बांध, आई म्हणाली मेरा भारत महान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 14:43 IST

प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी हा अखेर मंगळवारी मायदेशी परतला.

नवी दिल्ली - प्रेमाच्या शोधात पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील तुरुंगात अडकून पडलेला हमीद निहाल अन्सारी हा अखेर मंगळवारी मायदेशी परतला.हमीदला भारतात परत आणण्यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोलाचा वाटा उचलला होता.  दरम्यान, हमीद अन्सारी याने आज सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्याच्या भावनांचा बांध फुटला. सुषणा स्वराज यांना जवळ घेत हमीदने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. यावेळी हमीदच्या आईनेही सुषमा स्वराज यांचे आभार मानले. मेरा भारत महान असे त्या यावेळी म्हणाल्या.  हमीद निहाल अन्सारीला भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी हमीदच्या कुटुंबीयांनी याआधीही सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांची भेट घेतल्याने जो आत्मविश्वास निर्माण झाला. त्यावरून आपला मुलगा देशात परत येईल, असे वाटू लागले. असे हमीदच्या आईने सांगितले.  

पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या हमीदबाबत सुषमा स्वराज यांना कळल्यानंतर त्यांनी हा प्रश्न पाकिस्तानसमोर उपस्थित केला. तसेच हमीद हा अवैधरीत्या पाकिस्तानमध्ये दाखल झाला असला तरी तो गुप्तहेर नसल्याचे दोन्ही देशातील अनेक व्यक्तींनी न्यायालयात सिद्ध केले. त्यानंतर हमीदच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  

दरम्यान, समाजमाध्यमाद्वारे प्रेम जुळलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात बेकायदेशीररित्या गेलेल्या हमीद निहाल अन्सारी या भारतीय तरुणाची मंगळवारी सहा वर्षांनी मुक्तता करण्यात आली. त्याला पाकिस्तानने मंगळवारी संध्याकाळी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले गेले. वाघा सीमेवर भारत व पाकिस्तानी लष्करामध्ये दररोज संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट हा सोहळा होतो. त्यावेळी दोन्ही बाजूला काही हजार प्रेक्षक तिथे जमा झालेले असतात. हा सोहळा संपल्यानंतर हमीद याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजIndiaभारतPakistanपाकिस्तान