शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्येही ‘मी टू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 04:55 IST

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. मद्रास यांना सक्तीची निवृत्ती

बंगळुरू : लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधील (आयआयएससी) वरिष्ठ प्राध्यापक आणि अनेक पुरस्कारांचे विजेते गिरीधर मद्रास यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. गिरीधर मद्रास यांची गणना जगातील महत्त्वाच्या वैज्ञानिकांमध्ये करण्यात येते.गिरीधर मद्रास हे अनेक वर्षे या संस्थेत शिकवत होते. आयआयएससीचे संचालक प्रा. अनुराग कुमार यांनी सांगितले की, ज्या बैठकीत प्रा. मद्रास यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला, त्या बैठकीच्या इतिवृत्तालाही आता मान्यता देण्यात आली आहे. सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडलेल्या प्रा. मद्रास यांना निवृत्तीनंतरचे फायदे मिळतील का, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.यापुढील काळात याच संस्थेत अन्य काम ते करू शकतील का, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमच्याकडे प्रा. मद्रास यांच्याविरोधात अलीकडेच लैंगिक शोषणाची तक्रार आली होती. तिची लगेचच चौकशी करून त्यांना सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे प्रा. अनुराग कुमार म्हणाले. काही जुन्या तक्रारीही आल्या होत्या; पण त्यात आता जाणे शक्य नाही, असे त्यांनी सूचित केले. (वृत्तसंस्था)प्लास्टिक विघटनाचे संशोधनप्रा. गिरीधर मद्रास यांना याआधी एस. एस. भटनागर पुरस्कार, स्कोपस यंग सायंटिस्ट अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. सध्या ते प्लास्टिकच्या विघटनाशी संबंधित संशोधन करीत होते. संस्थेने घेतलेल्या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया मात्र समजू शकली नाही.

टॅग्स :Metoo Campaignमीटू