शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

समुद्रात भारतीय नौदलाची ताकद वाढणार, २६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब; चीन-पाकिस्तानला धडकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 11:10 IST

Rafale Deal For Indian Navy :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत सरकारने शनिवारी (१५ जुलै) ही घोषणा केली. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून २६ नवीन अॅडव्हॉन्स राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. 

राफेलची निर्माता कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने याबाबत माहिती दिली आहे. दसॉल्ट एव्हिएशनने म्हटले आहे की, "भारतीय नौदलाला नवीनतम पिढीतील लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी भारत सरकारने नौदल राफेलची निवड जाहीर केली. भारतीय नौदलाचे २६ राफेल आधीच सेवेत असलेल्या ३६ राफेलमध्ये सामील होतील." दरम्यान, भारतीय वायुसेनेसाठी फ्रान्सकडून यापूर्वीच ३६ राफेल खरेदी करण्यात आली आहेत. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी (१३ जुलै) फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दसॉल्ट एव्हिएशनने पुढे म्हटले की, हा निर्णय भारतात आयोजित एक यशस्वी चाचणी मोहिमेनंतर घेण्यात आला आहे, ज्यामध्ये नौदलाच्या राफेलने हे सिद्ध केले आहे की, ते भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करते आणि त्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. दरम्यान, या संरक्षण करारात भारताला २२ सिंगल सीटर राफेल-एम मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही लढाऊ विमाने स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात केली जातील. याचबरोबर ४ ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. राफेल-एम ही फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची नौदल आवृत्ती आहे. या संरक्षण करारानंतर भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.

इंडो-पॅसिफिकमध्ये भारताची ताकद वाढणार!भारतीय नौदलाला बऱ्याच काळापासून आधुनिक पिढीच्या लढाऊ विमानांची गरज भासत होती. इंडो-पॅसिफिकमध्ये चीनच्या हालचाली पाहता हा खरेदीचा प्रस्ताव लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी नौदलाची अपेक्षा होती. चीन हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत भारतीय नौदलाने समुद्रात आपली ताकद वाढवून मजबूत राहण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन या लढाऊ विमानांची खरेदी करण्यात आली आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलFranceफ्रान्सIndiaभारत