शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 09:57 IST

United State Crime News: अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय इंजिनियरचा मृत्यू झाला असून, मृत तरुण हा भारतातील तेलंगाणा राज्यातील रहिवासी होता.

अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय इंजिनियरचा मृत्यू झाला असून, मृत तरुण हा भारतातील तेलंगाणा राज्यातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणाचं रुममेटसोबत भांडण झालं होतं. तसेच प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं होतं. त्यादरम्यान शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. मग घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करताच  या तरुणावर धडाधड चार गोल्या झाडल्या, असा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सदर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करण्याचं आवाहन भारत सरकार आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना केलं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद निजामुद्दीन हा कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास होता. तिथेच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. निजामुद्दीन हा २०१६ साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने फ्लोरिडा येथील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला तिथल्याच एका कंपनीत नोकरी लागली होती. काही काळाने प्रमोशन मिळाल्यानंतर तो कॅलिफोर्निया येथे गेला होता.

दरम्यान, नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या १०-१५ दिवसांपासून निजामुद्दीन याच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात निजामुद्दीन याचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला सोशल मीडिया आणि माहितगारांकडून शुक्रवारी मिळाली. आणय़ी एका नातेवाईकाने सांगितले की, निजामुद्दीन याचं एसीवरून रुममेटसोबत भांडण झालं होतं. त्यावरून वाद विकोपाला गेला तसेच चाकू काढले गेले. याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना हात वर करण्यास सांगितले. पोलिसांचं ऐकून एका तरुणाने हात वर केले. मात्र निजामुद्दीन यांने पोलिसांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात निजामुद्दीन याचा मृत्यू झाला. कुठलीही माहिती न घेता पोलिसांनी गोळीबार करणं ही दुर्दैवी बाब आहे, असेही या नातेवाईकांनी म्हटले आहे.  

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतTelanganaतेलंगणा