शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्था राहू शकेल लवचिक; परकीय गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे ठरले केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:50 IST

संयुक्त राष्ट्रांचा अंदाज : परकीय गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे ठरले केंद्र

संयुक्त राष्ट्रे : कोविडच्या प्रकोपानंतर भारतामध्ये कमी प्रमाणात का होईना पण आर्थिक वाढ होण्याची शक्यता असून मोठी बाजारपेठ असल्याने हा देश गुंतवणूकदारांचे आकर्षण राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन विचार करता दक्षिण तसेच नैऋत्य आशियामधील सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था असा भारताचा लौकिक राहण्याची अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे. 

‘आशिया आणि प्रशांत क्षेत्रामध्ये होत असलेली थेट परकीय गुंतवणूक ’ याबाबतच्या एका अहवालामध्ये वरील मत वर्तविण्यात आले आहे. या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, सन २०१९मध्ये दक्षिण आणि नैऋत्य आशियामध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये २ टक्क्यांची घट झाली आहे. आधीच्या वर्षाशी तुलना करता ती १ अब्ज डॉलर कमी झाली. भारतामध्ये मात्र या काळामध्ये अन्य देशांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये थेट परकीय गुंतवणूक (५१ अब्ज डॉलर) झालेली दिसून आली.

मागील वर्षापेक्षा ही गुंतवणूक २० टक्के अधिक झाली आहे.  यापैकी काही देशांमधून तर ही टक्केवारी ७७ टक्क्यांपर्यंत गेली असल्याचे अहवालामध्ये नमूद केले गेले आहे. भारतामध्ये आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी बहुतांश गुंतवणूक ही माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये आली आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये स्थानिक संपन्न परिस्थितीचा लाभ मिळत असल्याने गुंतवणूक वाढत आहे. विशेष म्हणजे ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्येही भारतात मोठी गुंतवणूक आली आहे. 

दीर्घकालीन विचार करता भारतीय अर्थव्यवस्था ही या क्षेत्रामधील सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था राहण्याचा अंदाज आहे. कोरोना पश्चातच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ भलेही कमी राहिली तरी ती शाश्वत स्वरूपाची असेल, त्यामुळे भारतातील परकीय गुंतवणूक सुरुच राहील, असे मतही व्यक्त झाले आहे. 

टॅग्स :businessव्यवसाय