शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

78 बांगलादेशी मच्छिमारांना अटक, भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 21:47 IST

भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सुरुच आहेत. सध्या बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. तसेच, बांगलादेशातून भारतात येणाऱ्या घुसखोरांचा अनेकदा चर्चेत असतो. अशातच भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. तसेच, 78 मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने अटक केली आहे. हे सर्व मच्छिमार बांगलादेशचे रहिवासी आहेत.

भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. या अंतर्गत 78 बांगलादेशी मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय तटरक्षक दलाने समाज माध्यमांवर माहिती दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान, भारतीय सागरी क्षेत्रात काही संशयास्पद हालचाली त्यांना जाणवल्या. 

तपासादरम्यान बांगलादेशातील दोन मासेमारी करणाऱ्या नौका, एफव्ही लैला – 2 आणि एफव्ही मेघना – 5 या कोणत्याही परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आले. या दोन्ही नौकांची नोंदणी बांगलादेशात झाली आहे. आणि त्यात अनुक्रमे 41 आणि 37 एवढे मच्छीमार होते. भारतीय तटरक्षक दलाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही नौका अडवल्या आणि त्याचा तपास केला. यातून पकडलेल्या मच्छीमारांना पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतfishermanमच्छीमार