शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बँकांमध्ये दर तासाला एक गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 08:49 IST

अहवालातून धक्कादायक माहिती समोर

गेल्या काही दिवसांमध्ये बँकांमधील अनेक घोटाळे उघडकीस आले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विक्रम कोठारी यांनी केलेली बँकांची फसवणूक गेल्या काही दिवसांमध्ये उजेडात आले. त्यामुळे बँकांमध्ये होणारे गैरव्यवहार एकापाठोपाठ समोर आले. बँकांमध्ये होणाऱ्या याच गैरव्यवहारांबद्दलचा एक अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. 2016 ते 2017 या आर्थिक वर्षात भारतीय बँकांमध्ये तब्बल 12,533 गैरव्यवहार घडल्याची आकडेवारी या अहवालातून समोर आली आहे. याची सरासरी काढल्यास भारतीय बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात दर तासाला एक घोटाळा झाला आहे.इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायझरी सर्व्हिसेसच्या अहवालातील आकडेवारीनुसार एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये 12,533 गैरव्यवहार झाले. यामुळे बँकांचे 18 हजार 170 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक गैरव्यवहार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाले. हा आकडा 3,893 इतका आहे. तर यानंतर आयसीआयसीआय (3,359) आणि एचडीएफसी (2,319) यांचा क्रमांक लागतो.  एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत झालेल्या गैरव्यवहारांमुळे सर्वाधिक नुकसान पंजाब नॅशनल बँकेचे झाले आहे. पंजाब नॅशनल बँकेला गेल्या आर्थिक वर्षात गैरव्यवहारांमुळे 2,810 कोटींचा फटका बसला आहे. पंजाब नॅशनल बँकेपाठोपाठ बँक ऑफ इंडिया (2,770 कोटी रुपये) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (2,420 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. 'व्यवस्थापन आणि कर्जदार यांच्यातील संगनमत, त्याकडे नियंत्रकाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बँकांमध्ये गैरव्यवहार होतात,' असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रबर्ती यांनी म्हटले. 

टॅग्स :bankबँकPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा