शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोमोबाइल क्षेत्राला अच्छे दिन; मे महिन्यात दररोज विकली 73,632 वाहनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 13:59 IST

मे महिन्याचा विचार केल्यास वाहनांच्या निर्यातीत 23.84 टक्के वाढ झाली आहे.

नवी दिल्ली- यावर्षी मे महिन्यात भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राला चांगले दिवस आल्याचे दिसून आले. मे महिन्यात 22.82 लाख वाहने विकली गेली  म्हणजेच या महिन्यात दररोज 73 हजार 632 वाहने विकली गेली आहेत. सार्वजनिक वाहतुकीची वाहनं, व्यावसायिक वाहनं, दुचाकी या सर्वांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मे 2017 पेक्षा या वर्षी वाहनांच्या विक्रीमध्ये 12.13 टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये 20.35 लाख वाहने विकली गेली होती. भारतीय वाहन उत्पादक संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये हे चित्र स्पष्ट झाले आहे.गेल्या महिन्यात कार आणि प्रवासी वाहने 3.01 लाख इतकी विकली गेली. एप्रिलमहिन्यापेक्षा त्यात 19.65 टक्के वाढ झाली आबे. होंडा आणि टोयोटा कंपन्यांनी नव्या कार बाजारात आणल्यामुळेही या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आली असे भारतीय वाहन उत्पादन संस्थेच्या अहवालातून दिसते. 2017 च्या मे महिन्यात 1.66 लाख कारची विक्री झाली होती. मे महिन्यात 82,086 एसयूव्ही गाड्यांची विक्री झाली तर 19,673 व्हॅन्सची विक्री झाली.व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये 43.06 टक्के इतकी मोठी वाढ झाली असून केवळ एका महिन्यामध्ये 76,478 व्यावसायिक वाहनं विकली गेली आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात 53 हजार 457 व्यावसायिक वाहनं विकली गेली होती.दुचाकींचा विचार केल्यास गेल्या वर्षातील मे महिन्यापेक्षा यंदाच्या मे महिन्यात दुचाकींच्या विक्रीमध्ये 9.19 टक्के वाढ झाली . एका महिन्यात 18.50 लाख दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी मे महिन्यात 16.94 लाख दुचाकी विकल्या गेल्या होत्या. स्कूटर्सची विक्री मात्र गेल्या 15 महिन्यांमध्ये प्रथमच घटली असून 5.55 लाख स्कूटर्स मे महिन्यात विकल्या गेल्या. वाहनांच्या निर्यातीत 23.84 टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :carकारbusinessव्यवसायIndiaभारत