शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अंतराळवीर पुढील वर्षी अवकाशात झेपावणार - इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 07:05 IST

अहमदाबाद : मानवाला अंतराळात घेऊन जाण्याच्या भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेतील चाचणी प्रक्षेपण येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार आहे. ...

अहमदाबाद : मानवाला अंतराळात घेऊन जाण्याच्या भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेतील चाचणी प्रक्षेपण येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्यानंतर अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अवकाशयानाचे पुढील वर्षी प्रक्षेपण करण्यात येईल, असे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. 

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) येथे गुरुवारी एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, चाचणी प्रक्षेपणासाठी तयार केलेल्या यंत्रणेच्या विविध भागांची जुळणी करण्याचे काम सध्या श्रीहरिकोटा येथे सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठी चाचणी प्रक्षेपण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही नवीन अग्निबाण तयार केला असून त्याला टेस्ट व्हेईकल असे म्हटले जाते. चाचणी प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर गगनयान मोहिमेच्या मुख्य टप्प्याला प्रारंभ होणार आहे. 

एस. सोमनाथ यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीच्या प्रारंभी गगनयान मोहिमेच्या अंतर्गत अंतराळवीरांसह अवकाशयानाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. अंतराळवीरांना पुन्हा सुरक्षितरीत्या पृथ्वीवर परत आणणे हा गगनयान मोहिमेतला महत्त्वाचा टप्पा व अंतराळवीरांची सुरक्षा हा प्रमुख मुद्दा आहे. अंतराळयानाचे प्रक्षेपण करताना अग्निबाणामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर त्या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यायी यंत्रणाही इस्रोने तयार केली आहे. (वृत्तसंस्था)

परम विक्रम-१०००फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये परम विक्रम-१००० या सुपरकॉम्प्युटरचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परम विक्रम-१००० हा सुपरकॉम्प्युटर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये  सध्या वापरात असलेल्या विक्रम-१००पेक्षा दहापट वेगाने काम करतो. त्यामुळे शास्त्रज्ञांना मोलाची मदत होणार आहे. 

टॅग्स :isroइस्रो