शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:02 IST

यासंदर्भात माहिती देताना आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पिनाकाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन करार केले जाणार आहेत...

भारतीय लष्कर स्वदेशी बनावटीच्या पिनाका मल्टी-लॉन्च आर्टिलरी रॉकेट सिस्टिमने पूर्णपणे सुसज्ज होण्यावर भर देत आहे. यासंदर्भात लवकरच एक मोठी डील होणार आहे. खरे तर, भारतीय लष्कराला पिनाका रॉकेट सिस्टिमसाठी मोठ्या प्रमाणावर दारुगोळ्याची आवश्यकता आहे. यामुळे याच आर्थिक वर्षात 10,200 कोटी रुपयांची ऑर्डर केली जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पिनाकाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन करार केले जाणार आहेत. एक करार ५,७०० कोटी रुपयांचा आहे आणि दुसरा ४,५०० कोटी रुपयांचा आहे, ज्यावर चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थात ३१ मार्च रोजी स्वाक्षरी केला जाईल.

सध्या भारतीय लष्करात १० पिनाका रेजिमेंट तयार करण्यात आल्या आहेत. यांपैकी ४ रेजिमेंट आधीच तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांचे काही लाँचर्स चीनला लागून असलेल्या उत्तरेकडील सीमेवर उंच भागात तैनात करण्यात आले आहेत. याशिवया उर्वरित ६ रेजिमेंट देखील तैनातीच्या प्रक्रियेत आहेत. पिनाका ही जगातील सर्वोत्तम रॉकेट प्रणालींपैकी एक आहे. ही प्रणाली उंचावर मारा करण्यास सक्षम आहे.

आर्मेनियातून मिळालीय ऑर्डर -गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात या प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीनंतर लगेचच, या प्रणालीला परदेशातूनही ऑर्डर मिळायला सुरुवात झाली आहे. आर्मेनियाने भारताकडून पिनाका रॉकेट खरेदी करण्यासाठी करार केला आहे. डीआरडीओने पिनाका प्रणालीसाठी विविध प्रकारची शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. यांत ४५ किमी आणि ७५ किमी मार्गदर्शित विस्तारित श्रेणीच्या रॉकेटचा समावेश आहे. ही श्रेणी १२० किमी आणि नंतर ३०० किमीपर्यंत वाढवण्यावर काम सुरू आहे.

यासंदर्भात बोलातना जनरल द्विवेदी म्हणाले, आम्हाला पिनाका रॉकेट्सची लांब पल्ल्याची रेंज मिळल्यानंतर, आपण इतर पर्यायी लांब पल्ल्याच्या शस्त्रांऐवजी या प्रणालीवर लक्ष केंद्रित करू शकतो.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDRDOडीआरडीओSoldierसैनिक