शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

लडाख ते अंदमान! आर्मीचे सॅटेलाईट सतत 5 दिवस होते अ‍ॅक्टिव्ह; का केलं ऑपरेशन स्कायलाईट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 14:35 IST

सैन्याने आपलं कम्युनिकेशन किती मजबूत आहे याची चाचपणी केली. शत्रूचा हल्ला झाल्यास त्याची हायटेक सॅटेलाइट कम्युनिकेशन यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासण्यासाठी ऑपरेशन 'स्कायलाइट' करण्यात आले.

नवी दिल्ली - अंदमान-निकोबार बेटांपासून ते लडाखपर्यंत सैन्याची सर्व सॅटेलाईट कम्युनिकेशन्स सिस्टम सतत पाच दिवस अ‍ॅक्टिव्ह राहिली. 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान, सैन्याने आपलं कम्युनिकेशन किती मजबूत आहे याची चाचपणी केली. शत्रूचा हल्ला झाल्यास त्याची हायटेक सॅटेलाइट कम्युनिकेशन यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासण्यासाठी ऑपरेशन 'स्कायलाइट' करण्यात आले. 5 दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये सैन्याने वेगवेगळ्या परिस्थितींवर मॉक-ड्रिल केले. 'स्कायलाइट' ऑपरेशनमध्ये इस्रो आणि इतर एजन्सींनीही सहभाग घेतला. सैन्याने हा संपूर्ण सराव चीनला डोळ्यासमोर ठेवून केला आहे. ड्रॅगनने अंतराळ, सायबर स्पेसपासून इलेक्ट्रॉनिक युद्धापर्यंत सर्व गोष्टींसाठी प्राणघातक शस्त्रे विकसित केली आहेत. चीनला लागून असलेली देशाची उत्तरेकडील सीमा लष्करासाठी मोठी चिंतेची बाब आहे.

या ऑपरेशनची का होती गरज?

मल्टी-डोमेन ऑपरेटरसाठी जागा तयार करण्यासाठी सैन्य अनेक आघाड्यांवर काम करत आहे. दुर्गम भागात लाईन ऑफ साईटपासून दूर टेक्निकल कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइट नेटवर्क्स आधीच कार्यरत आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, जगाने सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाबरोबरच कम्युनिकेशन्सचा वापर पाहिला. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने डिफेन्स सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इलॉन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या मालकीच्या 'स्टारलिंक'ने विश्वसनीय सॅटेलाइट कम्युनिकेशन्सच्या प्रभावावर शिक्कामोर्तब केले आहे.

सैन्याला डेडिकेटेड सॅटेलाइट देण्याचे काम सुरू 

सैन्य सध्या इस्रोच्या अनेक सॅटेलाइटचा वापर करतं. याद्वारे शेकडो स्टॅटिक कम्युनिकेशन टर्मिनल्स, ट्रान्सपोर्टेबल व्हिइकल-माउंट टर्मिनल्स, मॅन-पोर्टेबल आणि मॅन-पॅक टर्मिनल्स जोडलेले आहेत. 2015 च्या अखेरीस पहिला डेडिकेटेड सॅटलाईट GSAT-7B प्रक्षेपित केल्यावर सैन्याच्या कम्युनिकेशनला मोठी चालना मिळेल. संरक्षण मंत्रालयाने मार्चमध्ये 4,635 कोटी रुपयांच्या या सॅटेलाइटला मंजुरी दिली होती. नौदल आणि हवाई दलाकडे GSAT-7 मालिकेचे सॅटेलाइट आधीपासूनच आहेत.

GSAT-7B चा कसा होईल फायदा?

नौदलाचा GSAT-7 सॅटेलाईट (रुक्मिणी) प्रामुख्याने हिंदी महासागर क्षेत्र कव्हर करतो. GSAT-7B चे लक्ष उत्तर सीमांवर असेल. प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह हा अशा प्रकारचा पहिला स्वदेशी मल्टीबँड सॅटेलाईट असेल. हे केवळ जमिनीवरील सैन्यालाच नव्हे तर दूर असलेल्या विमानांना आणि इतर मिशन क्रिटिकल आणि फायर-सपोर्ट प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक टेक्निकल कम्युनिकेशन प्रदान करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन