शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Army Iftar Party: भारतीय सैन्याने केले इफ्तार पार्टीचे आयोजन, फोटो शेअर करताच नेटकरी संतापले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 08:35 IST

Indian Army Iftar Party in Doda: इंडियन आर्मीने इफ्तार पार्टीचे आयोजन करुन यासंदर्भात काही फोटो शेअर केले होते, पण नेटीझन्सचा संताप पाहून नंतर ते फोटो डिलीट करावे लागले.

Indian Army Iftar Party in Doda: भारतीय सैन्याला इफ्तार पार्टीशी संबंधित एका ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. सैन्याने जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी 'इफ्तार' पार्टीचे आयोजन केले होते. लष्कराने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली, पण याचे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. यानंतर लष्कराला ते ट्विट डिलीट करावे लागले.

दोडामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजनलष्कराच्या जम्मू क्षेत्राच्या पीआरओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'धर्मनिरपेक्षतेची परंपरा जिवंत ठेवत भारतीय लष्कराने डोडा जिल्ह्यातील अर्नोरा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.' ट्विटसोबत 4 फोटोही टाकण्यात आली, ज्यामध्ये लष्कराचे जवान आणि सामान्य लोक एकत्र उपवास सोडताना दिसत होते. हे ट्विट आल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. एका यूजरने ट्विट करून लिहिले की, 'आता हा आजार लष्करातही दाखल झाला. दुःखद.'

सोशल मीडियावर ट्रोलहे ट्विट 21 एप्रिल रोजी करण्यात आले होते. लष्कराच्या या ट्विटला धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात वर्णन करत अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर लष्कराने काही तासांनंतर हे ट्विट काढून टाकले. दरम्यान, लष्कराच्या प्रवक्त्याने ट्विट हटवण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जनतेशी मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी इफ्तार पार्ट्या नियमितपणे आयोजित केल्या जातात. यावेळीही जम्मू-काश्मीरमध्ये परंपरेनुसार अशी पार्टी आयोजित करण्यात आली होती. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTwitterट्विटर