शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

भारतीय लष्कराची 'मातृशक्ती'ला साद; 'अतिरेकी मार्गावरील मुलांना घरी परत बोलवा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 12:01 IST

पुलवामामधील पिंगलान येथे सोमवारी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

ठळक मुद्दे100 तासांच्या आत जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा खात्मा- भारतीय लष्कर हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही - भारतीय लष्कर पुलवामा हल्ल्यामध्ये ISIचा हात - भारतीय लष्कर

नवी दिल्ली - पुलवामामधील पिंगलान येथे सोमवारी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल आणि सीआरपीएफने मंगळवारी (19 फेब्रुवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीला पुलवामा दहशतवादी हल्ला आणि चकमकीदरम्यान शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.  ''100 तासांच्या आतमध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यात आला'', अशी माहिती भारतीय लष्कराने यावेळेस दिली.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यामध्ये ISIचा हात होता, ISIच्या मदतीने 'जैश-ए-मोहम्मद'ने हल्ला केला, असा मोठा खुलासादेखील भारतीय लष्कराने यावेळेस केला.

पत्रकार परिषदेमध्ये सीआरपीएफ, जम्मू काश्मीरचे पोलीस वरिष्ठ पोलील अधिकारीदेखील सहभागी झाले होते. चिनार कॉर्प्सचे लेफ्टनन्ट जनरल के.जी. ढिलन्न, श्रीनगरचे आयजी एसपी पाणी, CRPFचे आयजी जुल्फिकार हसन आणि GoC विक्टर फोर्सचे मेजर जनरल मॅथ्यू यांचा पत्रकार परिषदेत समावेश होता.

काश्मीरमधील मातांना भारतीय लष्कराचे आवाहन

यावेळेस भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहनदेखील केले. ''दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना समजवा आणि माघारी बोलवा. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे.आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत. पण हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही'', असा स्पष्ट इशारा यावेळेस भारतीय लष्कराकडून देण्यात आला. 

आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत - भारतीय लष्करसीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन यांनी सांगितले की, 'शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वतःला एकटे समजू नये. तुमच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. शिवाय, देशातील निरनिराळ्या भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांसहीत आम्ही हेल्पलाइन चालवत आहोत. जेणेकरुन त्यांना कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये'

'जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्याचा वरदहस्त'चकमकीवेळी तसंच चकमक झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. चकमकीच्या ठिकाणी कोणी गेल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि  ISIचा जैश-ए-मोहम्मदवर वरदहस्त आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड कामरानच होता, पिंगलान चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. 

'...तर कोणताही दहशतवादी जिवंत राहणार नाही' 

कोणताही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसल्यास, तो जिवंत राहणार नाही, असा इशार कठोर इशारादेखील यावेळेस देण्यात आला. काश्मीरचे आयजी एस.पी.पाणी यांनी सांगितले की, 2018मध्ये आम्ही जैश-ए-मोहम्मदच्या 58 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावर्षी आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या 12 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.  

14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या होत्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर