शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कर म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 07:38 IST

नागालँडच्या सीमेजवळ दहशतवाद्यांचे 38 तळ

नवी दिल्ली: भारतीय लष्कर म्यानमारमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड (के) या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. म्यानमागरमधल्या कोनयांक भागात एनएससीएन (के) संघटनेनं तळ तयार केले आहेत. हा भाग नागालँडपासून अगदी जवळ आहे. म्यानमारच्या लष्करानं या भागाचे फोटो पाठवल्यावर भारतीय लष्कराकडून कारवाईला सुरुवात केली जाऊ शकते, असं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं दिलं आहे. 2015 मध्येही भारतीय सैन्यानं म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. सध्या नागा बंडखोरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे. अनेक संघटनांशी बातचीत सुरू आहे. एनएससीएन (के) संघटनेत दोन गट पडले असल्यानं संवादाची प्रक्रिया सोपी होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यातील एक गट संवादासाठी तयारही झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये दहशतवाद्यांचे 38 तळ आहेत. एनएससीएन (के) नं बातचीत करावी, यासाठी म्यानमार लष्कराकडून दबाव आणला जात आहे. एनएससीएन (के) चं प्राबल्य असलेल्या भागात म्यानमारच्या लष्कराची अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी नागा बंडखोरांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व संघटनांशी बातचीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नागा समुदायाला स्वतंत्र प्रांत देण्यात यावा, या मागणीवर एनएससीएन (के) ठाम आहे. तर या मागणीवर अडून बसल्यास चर्चा केली जाणार नाही, अशी मोदी सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकची तयारी सुरू केली आहे. म्यानमार लष्करानं दहशतवाद्यांच्या तळाची माहिती पुरवल्यावर भारतीय सैन्याकडून मोठी कारवाई केली जाऊ शकते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMyanmarम्यानमार