शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानाने चीनचा झाला तीळपापड! इशा-याची भाषा, जरा सांभाळून अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 6:37 PM

भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते.

ठळक मुद्देमागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितलेभारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते.

नवी दिल्ली - भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या विधानावर सोमवारी चीनने तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पूर्णपणे अयोग्य असून त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे सीमेवरील शांतता आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते असे चीनने म्हटले आहे. भारताने आता पाकिस्तानपेक्षा उत्तरेकडच्या चीनला लागून असणा-या सीमेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. चीन जर बलवान असेल तर भारतही कमकुवत नाही असे विधान बिपिन रावत यांनी मागच्या आठवडयात केले होते. 

मागच्या वर्षभरात भारत-चीन संबंधात अनेक नाटयमय कलाटणी देणारी वळणे आली आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारत-चीनच्या नेत्यांनी दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी मतभेदांचे मुद्दे सामंजस्याने हाताळण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत भारताच्या वरिष्ठ अधिका-यांनी अशा प्रकारचे अयोग्य मतप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्याला खीळ बसू शकते असे लु कांग म्हणाले. यामुळे सीमा भागात शांतता आणि स्थिरता राहणार नाही. 

काय म्हणाले होते बिपीन रावत दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन रावत म्हणाले होते  की, 'चीन एक शक्तिशाली देश आहे, पण आपणही दुबळे नाही आहोत'. चीनी घुसखोरीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी आम्ही कोणालाही आमच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याची परवानगी देणार नसल्याचं सांगितलं. 'चीन सीमारेषेवर दबाव वाढवत आहे हे खरं आहे, पण आम्ही त्याचा सामना करत आहोत', असंही ते बोलले आहेत. 'चीनसोबत तणाव वाढू नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आम्ही लोक आपल्या जमिनीवर घुसखोरी होऊ देणार नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढील कारवाईसाठी लष्कराला योग्य ते आदेश देण्यात आले आहेत', असं बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनBipin Rawatबिपीन रावत