शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'काश्मिरींची हत्या करण्यासाठी दहशतवादी झाकीर मुसा करतोय भारतीय लष्कराची मदत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:27 IST

जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सर्व ठिकाणी हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स चिकटवलेले दिसत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून हिजबूलने आपला माजी कमांडर झाकीर मुसाविरोधात राग व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सर्व ठिकाणी हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेतझाकीर मूसा काश्मिरींची हत्या करण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांची मदत करत आहे असं या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं आहे'हा भारतीय एजंट झाकीर मूसा जिथे कुठे भेटेल, त्याला पकडून मारुन टाका', असं आवाहनच हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्समधून केलं आहे

श्रीनगर, दि. 18 - जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सर्व ठिकाणी हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स चिकटवलेले दिसत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून हिजबूलने आपला माजी कमांडर झाकीर मुसाविरोधात राग व्यक्त केला आहे. झाकीर मूसा काश्मिरींची हत्या करण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांची मदत करत आहे असं या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं आहे. पोस्टर्सच्या माध्यमातून लोकांनाही उकसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'हा भारतीय एजंट झाकीर मूसा जिथे कुठे भेटेल, त्याला पकडून मारुन टाका', असं आवाहनच हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्समधून केलं आहे. 

हे पोस्टर्स उर्दू भाषेत आहेत. सर्व पोस्टर्समध्ये झाकीर मुसाचा फोटो लावण्यात आला आहे. पोस्टर्समधून दावा करण्यात आला आहे की, 'भारतीय लष्कराकडून मोठी रक्कम घेऊन झाकीर मुसा निर्दोष काश्मिरींची हत्या करत आहे. विश्वासघाती सरकारला मदत करत झाकीर मूसा श्रीमंत होण्याची स्वप्नं बघत आहे. सुरुवातील तो हिजबून मुजाहिद्दीनचा भाग होता, पण आता त्याने भारत सरकारशी हातमिळवणी केली आहे. अशा परिस्थितीत तो जिथे कुठे भेटेल, त्याला मारुन टाका'.

23 वर्षीय झाकीर मूसा याने काही महिन्यांपुर्वी हिजबूल मुजाहिद्दीनची साथ सोडत 'गजवा-ए-हिंद'मध्ये (अल कायदाची दहशतवादी संघटना) सामील झाला होता. आपण दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याचा दावा तो करत आला आहे.  झाकीर मुसाने हिजबूलची साथ सोडताना सांगितलं होतं की, 'फुटीरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्स काश्मीरला राजकीय समस्सा सांगत सामान्य लोकांना फासावर लटकवत आहे'. 

याचवर्षी जुलै महिन्यात अल कायदाने झाकीर मुसा 'गजवा-ए-हिंद'चा प्रमुख असेल अशी घोषणा केली होती. काश्मीरला मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी जिहादचा झेंडा फडकावणं गरजेचं आहे. यासाठी झाकीर मुसाकडे सुत्रं सोपवण्यात आली आहेत असं अल कायदाने सांगितलं होतं. 

बकरी ईदच्या आधी झाकीर मुसाने भारताला गोभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून मुक्त करणार असल्याची धमकी दिली होती. बकरी-ईदच्या आधी झाकीर मुसाने 10 मिनिटांचा ऑडिओ मेसेज जारी करत ही धमकी दिली होती.  'गोभक्त नरेंद्र मोदी राजकारण आणि डिप्लोमसी करत लोक जमा करु शकतात, मात्र ते आम्हाला थांबवू शकत नाहीत. आम्ही भारतात इस्लामचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही', असं झाकीर मुसा बोलला होता. 

 

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला