शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टॅरिफच्या तणावात भारतीय राजदूतांकडून सिनेटर्सची भेट, दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर केली व्यापक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:26 IST

India-US Relation News: अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक अमेरिकी सिनेटर्सशी चर्चा केली. टॅरिफवरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली.

न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक अमेरिकी सिनेटर्सशी चर्चा केली. टॅरिफवरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली.

क्वात्रा यांनी केलेल्या पोस्टनुसार ९ ऑगस्टपासून आतापर्यंत त्यांनी १९ अमेरिकी सिनेटर्सची भेट घेतली असून, काँग्रेसच्या काही सदस्यांशीही चर्चा केली आहे. शुक्रवारी त्यांनी ‘वेज अँड मीन्स कमिटी’ तसेच ‘हाऊस इंटेलिजन्स कमिटी’च्या सदस्य क्लाऊडिया टेनी यांची भेट घेतली. दोन्ही देशांत निष्पक्ष आणि संतुलित व्यापारी संबंधांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.

हायड्रोकार्बन खरेदी, कृषी, परराष्ट्र विषयांवर चर्चा भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बनची खरेदी करीत आहेत. भारतातील ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा व्यवहार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे क्वात्रा यांनी टेनी यांच्याशी चर्चेदरम्यान नमूद केले. अशाच अन्य एका बैठकीत डेमोक्रॅट सदस्य जोनाथन जॅक्सन यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र आणि कृषिविषयक समितीचे जॅक्सन हे सदस्य आहेत.

संतुलित व्यापारी संबंधांवर भरअमेरिकी काँग्रेसच्या मिशिगन येथील सदस्य हेली स्टिव्हन्स यांच्या भेटीतही क्वात्रा यांनी अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हायड्रोकार्बनच्या खरेदीचा खास उल्लेख केला. संतुलित व्यापारी संबंधांच्या दृष्टीने या व्यवहाराचे वेगळे महत्त्व असल्याचे क्वात्रा म्हणाले.भेटीगाठींचे हे आहे कारणट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे.  रशियाकडून सुरू असलेली इंधन तेलाची खरेदी भारताच्या ऊर्जा क्षेत्रासह राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका