शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: 'एअर स्ट्राइक'वर कंट्रोल रुममधून होती नरेंद्र मोदींची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 14:04 IST

भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत

ठळक मुद्देभारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईची भारतीय लष्करासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रशंसा केली आहे. 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं.

नवी दिल्ली-भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईची भारतीय लष्करासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रशंसा केली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी बदला घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं. बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे.या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचं अभिनंदन केलं आहे. दहशतवादी शिबिरांना नेस्तनाबूत करण्यात आलं आहे. मोदींनी पहिलंच सांगितलं होतं की, लष्कराला कारवाईसाठी मोकळीक दिली आहे. मी पंतप्रधानांना शुभेच्छा देतो, सर्व नागरिकांच्या इच्छेप्रमाणे कारवाई झाली आहे. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, हे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल आहे.हा महापराक्रम आहे. मोदींनी लष्कराला कारवाईची सूट दिली होती. त्यानंतर पूर्ण देश त्यांच्या पाठीशी होता. भारतानं 2016ला उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक केली होती, त्यावेळीही मोदी पूर्ण रात्र ऑपरेशनची माहिती घेत होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये एकही जवान जखमी होणार नाही, हेसुद्धा निश्चित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्ट्राइकवर नजर ठेवून होते. तीन दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले होते, हा बदललेला भारत आहे. यावेळी सर्व हिशेब पूर्ण करू. हा हल्ल्याच्या घावानंतर आम्ही शांत राहणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना संपवू. मोदींच्या या विधानाप्रमाणेच त्यांनी कारवाईही केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल