शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: जिथं निशाणा साधला, ते भाग उद्ध्वस्त केले- हवाई दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 20:28 IST

हवाई दलानं पत्रकार परिषदेत दिली हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: आम्ही ज्या भागांना लक्ष्य केलं त्या भागांना उद्ध्वस्त केलं, असं हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलं. कपूर यांनी लष्कर आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेत भारतानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या कामगिरीची आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीर आणि खैबर पख्तुनख्वामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास केलेली कारवाई यशस्वी ठरल्याची माहिती जी. के. कपूर यांनी हवाई दलाच्या वतीनं दिली. मात्र या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 'मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा देणं घाईचं ठरेल. मात्र आम्ही ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले, ती सर्व ठिकाणं उद्ध्वस्त केली,' असं कपूर यांनी सांगितलं. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचा कपूर यांनी समाचार घेतला. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत, एफ-16 विमानाचा वापर झालेलाच नाही, असे विविध दावे पाकिस्तानकडून करण्यात आले होते. हे सर्व दावे भारतीय हवाई दलानं खोडून काढले. 'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होता,' अशा शब्दांमध्ये हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचं पोस्टमॉर्टम केलं. 

आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानचे सर्व दावे मुद्देसूदपणे खोडून काढले. 'पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे आहेत. एफ-16 विमानांची हालचाल दिसताच हवाई दलानं प्रत्युत्तर दिलं. हे विमान अनेक ठिकाणी दिसलं. मिग-27, मिराज 2000, सुखोई विमानांनी एफ-16 च्या हालचाली टिपल्या. एफ-16 नं लष्करी तळांजवळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून बॉम्ब टाकण्यात आले. लष्करी तळांच्या परिसरात बॉम्ब टाकले गेले. मात्र त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. यामुळेच हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत एफ-16 पाडलं. मिग 27 विमानानं एफ-16 जमीनदोस्त केलं,' अशी माहिती कपूर यांनी दिली. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान