शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळले, सात जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:52 IST

भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी मोहिमेवर असताना अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळले.

ठळक मुद्दे2013 सालच्या जून महिन्यात उत्तराखंडमध्ये एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. भारत आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार मागच्यावर्षी रशियाने एमआय-17 व्ही 5 कॅटगरीतील तीन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगजवळ कोसळले.  या दुर्घटनेत एअर फोर्सच्या सात जवानांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. एअर मेंटेनन्स मिशनवर असताना या हॅलिकॉप्टरला  सकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

यापूर्वी 2013 सालच्या जून महिन्यात उत्तराखंडमध्ये एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. उत्तराखंडमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बचाव मोहिमेवर असताना  एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत एअर फोर्सच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता. 

भारत आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार मागच्यावर्षी रशियाने एमआय-17 व्ही 5 कॅटगरीतील तीन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली. भारत सरकारने रशियाच्या रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशन बरोबर एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. एमआय-17 हेलिकॉप्टरचा प्रामुख्याने हवाई वाहतुकीसाठी वापर केला जातो. 

यावर्षी जुलै महिन्यात राजस्थानमधील जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 लढाऊ विमान कोसळले होते. सुदैवाने या घटनेत विमानातील दोन्ही वैमानिक बचावले. या दुर्घटनेच्या दोन दिवसआधी म्हणजेच 4 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूमपरे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. 

अरुणाचल प्रदेशमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात....4 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूमपरे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशच्या पापुमपरे भागामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. मंगळवारी पूरस्थिती असलेल्या परिसरामध्ये मदतकार्य करत असताना अरुणाचल प्रदेशमधील सगली गावाजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाल्याची माहिती मिळाली होती. इटानगर ते नहरलगूनदरम्यान हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झाले होते. 

 MIG-23 विमानाची खासियत...- भारतीय हवाई दलातील MIG-23 हे एक लढाऊ विमान असून सोवियत संघमधील मिकॉयन-गुरेविच डिझाईन ब्युरोद्वारा तयार करण्यात आले आहे. या विमानाची लांबी 17 मीटर इतकी आहे. तसेच, या विमानचा वापर प्रशिक्षण देण्यापासून ते युद्धासाठी करण्यात येतो.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल