शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर सीमेवर वायुदलाने दाखवली ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 03:56 IST

राफेलसह लढाऊ विमानांचे हवाई संचलन

हिंडन (गाझियाबाद) : भारतीय वायुदलाने उत्तर सीमेवर मोहीम क्षमता आणि गरज पडेल तेव्हा शत्रूचा प्रभावीपणे मुकाबला करण्याचा दृढनिश्चय दाखविला आहे, असे अभिमानपूर्वक सांगत वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदौरियांनी पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमावादावरून निर्माण झालेल्या कोंडीदरम्यान तत्पर प्रतिक्रियेबद्दल हवाई योद्ध्यांची प्रशंसा केली.भारतीय वायुदलाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत राष्टÑीय सार्वभौमत्व आणि हिताच्या रक्षणासाठी भारतीय फौजा सदैव सज्ज राहून क्षमता सातत्याने वाढवीत राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पूर्व लडाखमधील सुरक्षेसंबंधीच्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी अत्यंत कमी वेळेत प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) युद्ध सामग्रीसह तैनात करणे आणि उत्तर सीमेवरील कोंडीदरम्यान दाखलविलेल्या तत्परतेबद्दल वायुदलाच्या योद्ध्यांची प्रशंसा केली.राष्टÑपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी वायुदलाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत वीर योद्ध्यांना सलाम केला. यावेळी हिंडन हवाईतळावर पार पडलेल्या शानदार हवाई संचलनात राफेलसह, तेजस, जग्वार, मिग-२९, मिग-२१, सुखोई-३० या लढाऊ विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून वायुदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल