शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेणार भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 09:04 IST

रशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- रशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून निर्बंध लादले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारताचं संरक्षण मंत्रालय 39 हजार कोटी रुपयांच्या S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी कराराच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदे(DAC)नं गुरुवारी रशियाकडून क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे. रशियाबरोबर झालेल्या व्यावसायिक चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासंदर्भातील हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील संरक्षण प्रकरणातील निर्णय हाताळणा-या कॅबिनेट समितीकडे पाठवण्यात येणार आहे. देशातील सर्वोच्च नेतृत्व यावर अंतिम निर्णय घेणार आहे.अमेरिकेनं भारताबरोबरची 'टू-प्लस-टू' बैठक रद्द केल्यानंतर डीएसीची बैठक झाली आहे. या बैठकीत रशियाकडून S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्याचा ठराव झाला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 6 जुलै रोजी बैठका आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण सहभागी होणार होत्या. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ऐन वेळी या बैठका रद्द करण्यात आल्या. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीच्या मुद्द्यावरून त्या बैठका रद्द केल्याची आता चर्चा आहे.भारतानं S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली मिळवण्यासाठी एक योजना बनवली होती. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या माध्यमातून शत्रूंची युद्धजहाजे, हेरगिरी करणा-या नौका, मिसाइल आणि ड्रोनला 400 किलोमीटरच्या टप्प्यात असताना हवेच्या 30 किलोमीटर वरच नेस्तनाबूत करता येणार आहे. भारताच्या संरक्षण दलात  S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली गेमचेंजर ठरणार आहे.तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यादरम्यान ऑक्टोबर 2016ला गोव्यात झालेल्या बैठकीत S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीवर सहमती झाली होती. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. परंतु दुसरीकडे अमेरिकेनं भारताला असा करार न करण्याचा इशारा दिला आहे. भारत आणि रशिया सध्या अमेरिकेचा कायदा CAATSAपासून बचाव करण्याच्या योजना आखत आहेत.अमेरिका या कायद्याच्या माध्यमातून दुस-या देशांना रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याला मज्जाव करत आहे. भारत आणि रशियामध्ये असलेल्या प्रस्तावित करारानुसार भारतीय हवाई दलाला 24 महिन्यांनंतर व्यवस्थापन प्रणाली, रडार आणि लाँचरसह S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहे. त्यानंतर 60 महिने म्हणजेच 5 वर्षांच्या आत भारताला उर्वरित S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहेत. ज्या प्रत्येकात दोन फायरिंग युनिट बसवण्यात आले आहेत. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताला स्वतःच्या महत्त्वाच्या शहरांचं संरक्षण करता येणार आहे. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशिया