शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या आयात शुल्काविरुद्ध भारत उठवणार आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:04 IST

अमेरिकेने अ‍ॅल्युमिनियम व पोलादाच्या आयात शुल्कात वाढ केल्याविरुद्ध भारत सरकार जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार करण्याचा विचारात आहे. या मुद्द्यावर वाणिज्य मंत्रालयात विस्तृत चर्चा झाली आहे. डब्ल्यूटीओशी संबंधित माजी अधिकाऱ्यांशीही विचारविनिमय करण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : अमेरिकेने अ‍ॅल्युमिनियम व पोलादाच्या आयात शुल्कात वाढ केल्याविरुद्ध भारत सरकार जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार करण्याचा विचारात आहे. या मुद्द्यावर वाणिज्य मंत्रालयात विस्तृत चर्चा झाली आहे. डब्ल्यूटीओशी संबंधित माजी अधिकाऱ्यांशीही विचारविनिमय करण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.याप्रकरणी भारताला मजबुतीने विरोध करण्यास वाव आहे, असे एका गटाला वाटते. तथापि, भारताने घाई न करता अन्य डब्ल्यूटीओ सदस्यांना हा वाद उपस्थित करू द्यावा. त्यानंतर भारताने त्यात सहभागी व्हावे, असे काहींचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भारताने सावध राहण्याचीही गरज आहे. अमेरिकेत भारताचे मोठ्या प्रमाणात हितसंबंध गुंतलेले आहेत. अमेरिकेत सॉफ्टवेअर आणि अन्य क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय भारतातून निर्यात होेणाºया सॉफ्टवेअरपैकी ८० टक्के निर्यात अमेरिकेत जाते. अमेरिकी कंपन्या पूर्णत: भारतीय कंपन्याआणि व्यावसायिकांवर अवलंबून आहेत. अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडील काही महिन्यांत भारत आणि चीन यांच्यासह इतर देशांना लक्ष्य बनविल्याने व्यापारी तणाव निर्माण झाला आहे.गेल्याच आठवड्यात अमेरिकेने भारताच्या अर्धा डझन निर्यात प्रोत्साहन योजनांना डब्ल्यूटीओमध्ये आक्षेप घेतला आहे. या योजनांद्वारे सबसिडी दिली जात असल्याने अमेरिकेतील व्यवसाय व कामगारांवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारतातून होणारी पोलाद व अ‍ॅल्युमिनियमची स्वस्त आयात रोखण्यासाठी अमेरिकेने या धातूंवरचा कर वाढवला आहे.चुकीचे पायंडे पाडणारा निर्णयअधिकाºयांनी सांगितले की, अमेरिकेने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमसंदर्भात घेतलेला निर्णय चुकीचे पायंडे पाडणारा आहे. डब्ल्यूटीओंतर्गत नियमावर आधारित व्यापार व्यवस्थेलाच त्यामुळे धक्का लागणार आहे. या प्रकरणी काय करता येईल, याबाबत भारत सरकार सध्या कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. त्यानुसार योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल.

टॅग्स :businessव्यवसायAmericaअमेरिकाIndiaभारत