शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत भारत ब्रिटनला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:32 IST

दररोज सुमारे दहा हजार नवे रुग्ण; मृत्यूदर मात्र घटला

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येबाबत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनमध्ये ही संख्या २ लाख ९० हजारांपेक्षा जास्त आहे तर सहाव्या क्रमांकावरील भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख ८६ हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येबाबतब्रिटनला मागे टाकण्याची चिन्हे दिसत आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी देशामध्ये कोरोनाचे ९,९९६ नवे रुग्ण आढळून आले. तसेच या एका दिवसात देशभरात ३५७ जणांचा बळी गेला. त्यामुळे भारतातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ८१०५ पेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून उपचारांनंतर आतापर्यंत १,४१,०२८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. गेल्या दहा दिवसांत देशामध्ये दररोज कोरोनाचे सुमारे १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत ९० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळून आला होता. त्यानंतर शंभर दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेली. त्यापुढील पंधरवड्यात आणखी एक लाख रुग्ण वाढले. त्यानंतर ही रुग्णसंख्या तीन लाखांच्या जवळपास पोहोचण्यास अवघा एक आठवडा पुरला. जेवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यापेक्षा अधिक संख्येने रुग्ण बरे होण्याचा टप्पा भारताने बुधवारी ओलांडला. उपचार सुरू असलेले रुग्ण व बरे झालेले रुग्ण यांच्यातील संख्येचा फरकमंगळवारी १,३७५ इतका होता. गुरुवारी तो ३५८० पर्यंत वाढला. देशात सध्या १,३७,४४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या आठवड्यात दररोज ५३९७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून आपापल्या घरी परतत आहेत. कोरोना आजाराचा भारतातील मृत्यूदर २.८ टक्के इतका कमी आहे. हा मृत्यूदरही मे महिन्याच्या अखेरीपासून कमी होण्यास सुरूवात झाली आहे.५० लाखांहून अधिक कोरोना चाचण्याच्देशात आजवर पार पडलेल्या कोरोनाच्या चाचण्यांनी बुधवारी ५० लाखांचा आकडा पार केला. मंगळवारपर्यंत कोरोनाच्या ५,०६१,३३२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ दर दहा लाख लोकांमागे देशात ३,७९७ लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. कोरोनाचा मोठा तडाखा बसलेल्या अन्य देशांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण भारतापेक्षाही अधिक आहे. इटलीमध्ये दर दहा लाख लोकांमागे ७५ हजार चाचण्या झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत