शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भारत आत्मनिर्भर होणार; स्वत:चे ‘झूम’ अ‍ॅप बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:06 IST

खाजगी क्षेत्रातील बाराहून अधिक कंपन्यांसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी कंपनीलाही भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क निर्माण करण्यास सांगितले आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : लॉकडाऊनदरम्यान व्हिडियो कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय ठरलेल्या चीनच्या ‘झूम नेटवर्क’प्रमाणे भारताचेही स्वत:चे ‘झूम नेटवर्क’ निर्माण करण्याच्या इराद्यातहत केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने प्राथमिक निधी देत खाजगी क्षेत्रातील बाराहून अधिक कंपन्यांसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी कंपनीलाही भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क निर्माण करण्यास सांगितले आहे.झूम ही चीनच्या मालकीची अमेरिकन कंपनी असून तिचे सर्व्हर मात्र चीनमध्ये आहे. राष्टÑीय माहिती केंद्राने (एनआयसी) केंद्र , राज्य सरकार आणि महत्त्वाच्या शासकीय संस्थांना व्हिडियो कॉन्फरन्सिंग नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे. याची कार्यक्षमता मर्यादित आहे. पंतप्रधान कार्यालय, संरक्षण, केंद्रीय मंत्रालये, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आदी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुरक्षित नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी एनआयसीच्या देशभरात ५०० आॅप्टीकल फायबर लाईन्स असल्या तरी एनआयसीचे वार्षिक अंदाजपत्रक फक्त १२०० कोटी रुपयांचेच आहे. दुसरे असे की, एनआयसीचे नेटवर्क एकाचवेळी व्हिडियो कॉन्फरन्सिंगमार्फत ५० ते ६० लोकांना एकमेकांना जोडू शकत नाही. पंतप्रधानांसह महत्त्वाच्या व्यक्तींनी एनआयसीच्या नेटवर्कमार्फत लॉकडाऊनदरम्यान १३३ व्हिडियो कॉन्फरन्स घेतल्या. एकूण ५७०० व्हिडियो कॉन्फरन्स झाल्या आहेत. ७० टक्के कामकाजही या नवीन तंत्रप्रणालीमार्फत केले जात असल्याने भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क असणे गरजचे वाटले.>एचसीएल, पीपललिंकसह १२ संभाव्य कंपन्याभारताचे व्हिडियो कॉन्फरन्सिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने एचसीएल टेक्नॉलॉजीस, झोहो कॉर्प, पीपललिंकसह बाराहून अधिक कंपन्यांची यादी तयार केली असून यासाठी २० लाखांचा निधी दिला जाईल.यापैकी अंतिमत: निवड झालेल्या कंपनीला केंद्र, राज्य सरकार आणि शासकीय संस्थांसाठी ही तंत्रप्रणाली स्थापन करण्याचे कंत्राट दिले जाईल. नवीन व्हिडियो कॉन्फरन्सिंग उत्पादन सर्व भारतीय भाषेत आणि भारतातच सांकेतिक कळ उपलब्ध असेल. विदेशी उत्पादनात हे शक्य नाही.एनआयसीचे नेटवर्क वाढती मागणी पूर्ण करण्यास असमर्थ असून भारत-चीन दरम्यानच्या तणावामुळे स्वतंत्र आणि सुरक्षित झूम नेटवर्क तयार करण्यास सांगण्यात आले आहे.