शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘इंजिन’, डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक फोरमवर पंतप्रधान मांडणार विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:20 IST

जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी डाव्होसला (स्वित्झर्लंड) रवाना होत आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील.

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी डाव्होसला (स्वित्झर्लंड) रवाना होत आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील.जागतिक आर्थिक फोरमची (डब्ल्यूइएफ) ४८ वी बैठक आल्प्स गिरीशिखरांच्या कुशीत वसलेल्या डाव्होसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे. डब्ल्यूईएफचे अध्यक्ष क्लाऊस श्वॉब हे सोमवारी त्याचे उद्घाटन करतील. मात्र पाच दिवस चालणाºया या परिषदेत पंतप्रधान मंगळवारी विषय मांडतील. त्याआधी सोमवारी सकाळी सहा केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन डाव्होसला रवाना होत आहेत. सोमवारी रात्रीच पंतप्रधान मोदी यांनी विदेशातील ४० कंपन्यांचे सीईओ व २० भारतीय कंपन्याचे सीईओ आणि अध्यक्षांसाठी विशेष मेजवानी डाव्होसमध्ये आयोजित केली आहे. या मेजवानीदरम्यान जागतिक गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली असल्याची चर्चा केली जाईल.मंगळवारी होणा-या मुख्य भाषणात मोदी हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उद्योगाभिमूख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले, भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळ्या पैशांविरुद्धची मोहिम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख आणि उद्योजांकसह जगभरातील ३ हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी होणार आहेत. मात्र मोदी व ट्रम्प हे वेगवेगळ्या दिवशी डाव्होसमध्ये असल्याने त्यंची भेट होणार नाही. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासीही दाखल होणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांची त्यांच्यासोबत कुठलिही बैठक होणार नाही, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. मात्र मोदी हे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.भारतीय योगविद्येचे मार्केटिंग-या परिषदेच्या निमित्ताने भारतीय योगविद्येचे मार्केटींग केले जाणार आहे. सोमवारी रात्री पंतप्रधानांनी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीवेळी योगविद्याचे सादरीकरण केले जाणार आहे. यासोबतच मेजवानीमध्ये भारतातील विविध खाद्य पदार्थांचा समावेश असेल. डब्ल्यूइएफच्या परिषदेसाी जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एच.डी. देवेगौडा यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी