शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भारताला दिलेल्या धमक्यांनंतर आता चीनची कूटनीती, नेपाळला चुचकारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 11:39 IST

गेल्या अनेक दिवसांपासून भारताला दिलेल्या  युद्धाच्या धमक्यांनी काहीच फरक पडत नसल्याचं पाहिल्यानंतर चीननं आता कूटनीतीचा उपयोग करण्यात सुरुवात केली

नवी दिल्ली, दि. 6 - गेल्या अनेक दिवसांपासून भारताला दिलेल्या  युद्धाच्या धमक्यांनी काहीच फरक पडत नसल्याचं पाहिल्यानंतर चीननं आता कूटनीतीचा उपयोग करण्यात सुरुवात केली आहे. कूटनीतीचा वापर करून भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवी दिल्लीतल्या चिनी उच्चायुक्तांनी नेपाळच्या अधिका-यांकडे या मुद्द्यावर स्वतःची बाजू मांडली आहे. त्यामुळेच चीनची नेपाळसोबत या मुद्द्यावर झालेली चर्चा भारतासाठी खूप महत्त्वाची ठरते.भारतातील एका वादग्रस्त क्षेत्रातून चीन आणि नेपाळ ट्रायजंक्शनच्या माध्यमातून व्यापार करतो. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भारत नेपाळवर प्रभाव पाडण्यासाठी संघर्ष करतोय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चीनच्या अधिका-यानं नेपाळच्या त्यांच्या समकक्ष अधिका-याशी डोकलाम मुद्द्यावर चर्चा केली आहे. भारतासोबत सुरू असलेल्या वादातील चीनची भूमिका त्या अधिका-यानं नेपाळी अधिका-याकडे स्पष्ट केली. चीन आणि नेपाळच्या अशा अधिका-यांची भेट यापूर्वी काठमांडू आणि बीजिंगमध्येही झाली होती. मात्र भारतानं इतर शेजारील देशांना या सर्व प्रकाराची माहिती दिल्याचं अद्याप सार्वजनिक केलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच या मुद्द्यावर भारताची अमेरिकेशीही चर्चा झाली होती.नेपाळनं आतापर्यंत या प्रकरणावर भारतीय अधिका-यांकडून कोणतीही माहिती मागवली नाही. नेपाळच्या विश्लेषकांच्या मते, भारत, चीन आणि भूतान यांच्या सुरू असलेला वाद त्या देशांसाठी हितकारक नाही.  नेपाळ चीन आणि भारतासोबत दोन ट्रायजंक्शन शेअर करतो. नेपाळच्या पश्चिमेकडच्या लिपुलेखमध्ये एक ट्रायजंक्शन आहेत, दुसरा ट्रायजंक्शन पूर्वेकडच्या जिनसंगमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून नेपाळ लिपुलेख या भूभागावर चिंतेत आहे. कारण हा वादग्रस्त भूभाग कालापानी भागात आहे. ज्यावर भारत आणि नेपाळ या दोघांचाही दावा आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिपुलेख मार्गे चीनशी व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नेपाळनं जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली होती. नेपाळच्या संसदेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता. भारत आणि चीनच्या संयुक्त विधानातून लिपुलेखचा उल्ले काढून टाकावा. कारण हा आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे, असं नेपाळच्या संसदेत खासदार म्हणाले होते. भारत आणि चीनच्या करारामुळे नेपाळच्या सार्वभौमत्वाला कोणाताही धोका तर नाही ना, याचीही शक्यता वर्तवली होती. यंदा भारत आणि चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी नेपाळच्या दौ-यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज  BIMSTEC बैठकीत सहभागी होण्यासाठी पुढील आठवड्यात जाणार आहे. तर चीनचे उपपंतप्रधानसुद्धा 14 ऑगस्ट रोजी नेपाळचा दौरा करणार आहेत. या बैठकीत सुषमा स्वराज आणि चीनचे उपपंतप्रधान यांच्यात डोकलाम वादावर चर्चा होण्याचीही शक्यता आहेत. भारताचा विरोध असतानाही नेपाळ चीनच्या वन वेल्ट वन रोड (OBOR) या प्रोजेक्टमध्ये आधीच सामील झाला आहे. या दौ-यात नेपाळ आणि चीनची पुढील रणनीतीही ठरू शकते. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.