शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:01 IST

India Vs Pakistan War: सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम साहू गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले.

भारत-पाकिस्तानमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना एलओसीवर एक मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम साहू गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले. अद्याप पाकिस्तानच्या तावडीतून त्यांना सोडविण्यात यश आलेले  नाही. यामुळे पश्चिम बंगालहून साहू यांची गर्भवती पत्नी फिरोजपूरला पोहोचली आहे. 

रजनी साहू या गर्भवती आहेत, पतीला सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलली जात आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आल्या आहेत. सैन्यातील सर्वजण आश्वासन देत आहेत. परंतू, बुधवारी त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यापासून काहीच प्रगती झालेली नाही. काय चर्चा सुरु आहे हे जाणण्यासाठी मी इथे आले असल्याचे त्या म्हणाल्या. जर बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून संतोषजनक माहिती नाही मिळाली तर मी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

कसे गेले पाकिस्तानच्या ताब्यात...सीमेजवळ काम करणाऱ्या शोतकऱ्यांच्या एका गटाचे संरक्षण करण्यासाठी साहू यांची ड्युटी लागली होती. यावेळी ते आराम करण्यासाठी जवळच्याच झाडाखाली गेले. यावेळी त्यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार केली. अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले, असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. साहू हे पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात आहेत.

साहुला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी सीमा दलांनी "ध्वज बैठक" आयोजित केली होती परंतु त्याच्या कुटुंबाला अधिक माहिती देण्यात आली नाही. रविवारपर्यंत काहीच माहिती न मिळाल्याने साहु यांची पत्नी मुलगा, भाऊ आणि बहीणीसोबत विमानाने चंदीगढला आले, यानंतर फिरोजपूरला जात बीएसएफच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPunjabपंजाबPakistanपाकिस्तानBSFसीमा सुरक्षा दल