शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

माइक पॉम्पियो नवी दिल्लीत, भारत-अमेरिकेदरम्यान मोठी बैठक; चीनचं लागलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 14:51 IST

भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल.

ठळक मुद्देभारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या या बैठकीवर चीनचेही बारीक लक्ष आहे.हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत.

नवी दिल्ली -चीनबरोबर सुरू असलेला सीमा वाद आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक, अशा परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्वाची बैटक होत आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर सोमवारी दिल्ली येथे पोहोचले. ते परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर 2+2 बैठकीत भाग घेतील.  

भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल. यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माइक पॉम्पियो यांच्यासोबत बैठक करतील. या बैठकीनंतर सायंकाळी डिनरचेही आयोजन करण्यात येणार आहे.

दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या या बैठकीवर चीनचेही बारीक लक्ष आहे. एवढेच नाही, तर चिनी माध्यमाने नुकतेच म्हटले होते, की अमेरिका आणि फ्रान्स यांचे संबंध जसे आहेत, तसे संबंध भारत आणि अमेरिकेचे होऊ शकणार नाहीत. चीनच्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की अमेरिकन मंत्री एकाच वेळी अनेक देशांचा दौरा करत आहेत. यावरून, अमेरिका भारताला इतर देशांप्रमाणेच समजतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे या बैठकीचा विशेष असा परिणाम होणार नाही. 

मंगळवारी खरी चर्चा - अमेरिकेचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री मंगळवारी नवी दिल्ली येथे वॉर मेमोरियलचा दौरा करतील आणि श्रद्धांजली देतील. यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये 2+2 बैठक सुरू होईल. या बैठकीत बेसिक एक्सचेंज तसेच कॉर्पोरेशन अॅग्रीमेंटवर शिक्कामोर्तब होऊ शकते. यानंतर अमेरिका भारताबरोबर अनेक महत्वपूर्ण गोष्टी शेअर करेल. यात सॅटेलाईटसह इतर सैनिकी माहितीचाही समावेश आहे. याशिवाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तथा सैन्य विषयक वातावरणावरही चर्चा होईल.

हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत. यानंतर भारत-अमेरिकेकडून शेअर करण्यात आलेली माहितीही जाहीर केली जाईल. चीनबरोबर सुरू असलेल्या तणावात अमेरिका अनेक वेळा भारताबरोबर उभा राहिला आहे. तसेच चीनवर परिस्थिती बिघडवण्याचाही आरोप केला आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन