शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर - शक्तिकांत दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:45 IST

वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले.

नवी दिल्ली :भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे बसलेल्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दास यांनी हे वक्तव्य केले आहे.वित्तीय आयोगाचे चेअरमन एन.के. सिंग यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट ऑफ पॉवर : हाफ अ सेंच्युरी बीइंग अ‍ॅट रिंगसाईड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी दास यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक व सरकारकडून समावेशी (अ‍ॅकामॉडेटिव्ह) पतधोरण आणि वित्तीय धोरण स्वीकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या ऐन उंबरठ्यावर उभे आहोत.वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले. कोविडपश्चात काळात देशाने वाटचाल करावी यासाठी सरकारने वित्तीय नकाशा (रोडमॅप) तयार करावा. या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था