ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे खळबळ; मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 03:22 PM2020-12-21T15:22:08+5:302020-12-21T15:43:16+5:30

ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी; उद्यापासून अंमलबजावणी सुरू

India Suspends Flights from UK After New Virus Strain Found | ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे खळबळ; मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे खळबळ; मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

Next

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.




ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येताच युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आणखी काही मुख्यमंत्री आणि नेत्यांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखा, असं आवाहन केंद्राला केलं होतं. त्यानंतर आता केंद्र सरकारनं विमानं सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही हवाई सेवा रोखली जाईल. त्यापूर्वी भारतात येणाऱ्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल.

केजरीवाल, गेहलोत यांनी केली होती मागणी
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती लक्षात घेता युरोपमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात अलर्ट जारी करण्यात आला असून घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

ब्रिटनमध्ये हाहा:कार
कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाउनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. 

नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली
ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिले जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. 
 

Read in English

Web Title: India Suspends Flights from UK After New Virus Strain Found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.