शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला, भारताकडून समन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 10:25 IST

पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देभारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला.

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे त्यांच्या पत्नीसह रावळपिंडीनजीक हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब गुरुद्वारा येथे जात असताना त्यांना अडविण्यात आले. गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही त्यांना ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे इस्लामाबादला माघारी फिरावे लागले.दरम्यान, पाकिस्तानच्या या कृत्याचा भारताकडून निषेध व्यक्त केला जात आहे. भारताने हा मुद्दा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडे उपस्थित केला आहे.. तसेच, या कृतीच्या माध्यमातून पाकिस्तानचा उद्दामपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मागच्या दोन महिन्यातील अजय बिसारिया यांना गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. अजय बिसारिया गुरुद्वारामध्ये शिख भाविकांची भेट घेणार होते. 

पाकच्या उच्चायुक्तांना समन्स याप्रकरणी भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना पाचारण करत त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला. भारतीय उच्चायुक्तांना त्यांचे कर्तव्य करण्यात अडथळा आणणे हा राजनैतिक संबंधांबाबतच्या व्हिएन्ना कराराचा भंग असल्याचे भारताने पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिले. 

टॅग्स :Ajay Bisariaअजय बिसारीयाPakistanपाकिस्तान