शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार 

By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 4:14 PM

चीनसोबत सीमेवर तणाव वाढला असताना भारताचा शस्त्रसज्जतेवर भर

नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमा वाद वाढत असताना, पूर्व लडाखमधील तणाव कायम असताना भारतानं शस्त्रसज्जतेवर भर दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय हवाई दलात राफेल विमानं दाखल झाली. यानंतर आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसची आधुनिक आवृत्ती आहे. त्याची मारक क्षमता ४०० किलोमीटर इतकी आहे. पीजे-१० प्रकल्पाच्या अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याची माहिती डीआरडीओनं दिली. ओदिशातल्या चांदिपूरमध्ये ब्रह्मोसची चाचणी घेण्यात आली. यामुळे भारतीय सैन्याचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. क्षेपणास्त्राची एअरफ्रेम आणि बूस्टर भारतातच तयार करण्यात आलं आहे. ब्रह्मोसची अत्याधुनिक आवृत्ती डीआरडीओ आणि एनपीओएमनं तयार केली आहे. नवं ब्रह्मोस क्षेपणास्त्र जमिनीसोबतच युद्धनौका, पाणबुडी, लढाऊ विमानांमधूनही डागता येऊ शकतं. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून डीआरडीओचं अभिनंदन केलं.२००५ मध्ये भारतानं आयएएनवर राजपूतवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात केलं. आता भविष्यात सर्वच युद्धनौकांवर अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात असेल. याआधी भारतीय लष्कराच्या तीन रेजिमेंटकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुपूर्द करण्यात आलं. ब्रह्मोसच्या अत्याधुनिक आवृत्तीमुळे लष्कराचं सामर्थ्य वाढणार आहे. सध्याच्या घडीला पूर्व लडाखमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतासाठी महत्त्वाची आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावBrahmos Missileब्राह्मोसRajnath Singhराजनाथ सिंह