शहरं
Join us  
Trending Stories
1
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
2
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
3
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
4
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
5
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
6
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
7
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
8
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
9
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
10
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
12
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
13
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
15
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
16
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
17
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
18
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
19
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
20
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी

ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:43 IST

India Singapore Ties: सिंगापूर भारतासाठी अतिशय महत्वाचा भागीदार आहे.

India Singapore Ties: इकडे अमेरिकेसोबत शुल्कावरुन वाद सुरू असताना, तिकडे भारतानेसिंगापूरसोबत मोठे करार केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) नवी दिल्लीत भेट झाली. यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये ५ महत्त्वाचे करार झाले. ग्रीन शिपिंगपासून ते अवकाशापर्यंत, भारत आणि सिंगापूर एकत्रितपणे येत्या काळात आशिया-पॅसिफिक प्रदेशाच्या राजकारण आणि अर्थव्यवस्थेला नवीन चालना देतील.

लॉरेन्स वोंग यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, सिंगापूर आमच्या अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ही केवळ आर्थिक भागीदारी नाही, तर सामायिक मूल्ये आणि विश्वासावर आधारित खोल मैत्री आहे. वोंग यांनी यावेळी म्हटले की, अनिश्चिततेने भरलेल्या जगात भारत-सिंगापूरची भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे बांधलेल्या इंडिया मुंबई कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. सिंगापूरच्या पीएसए इंटरनॅशनलने त्यात एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

दोन्ही देशांमध्ये हे ५ मोठे करार

डिजिटल अॅसेट इनोव्हेशन - आरबीआय आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणामधील करार. सीमापार पेमेंट आणि डिजिटल चॅनेल मजबूत केले जातील.

एव्हिएशन प्रशिक्षण आणि संशोधन - एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) आणि सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी ऑफ सिंगापूर विमान वाहतूक क्षेत्रात क्षमता वाढवण्यासाठी एकत्र काम करतील.

ग्रीन अँड डिजिटल शिपिंग कॉरिडॉर - दोन्ही देश संयुक्तपणे शिपिंग क्षेत्रात शून्य-उत्सर्जन इंधन आणि स्मार्ट पोर्ट तंत्रज्ञानासाठी एक फ्रेमवर्क तयार करतील.

मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कौशल्य - चेन्नईमध्ये कौशल्यासाठी एक राष्ट्रीय स्तराचे केंद्र बांधले जाईल.

स्पेस कोलाबोरेशन - सिंगापूर आणि भारत यांच्यातील अंतराळ उद्योगात सहकार्य वाढेल. आतापर्यंत भारताने सिंगापूरचे सुमारे २० उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

भारतासाठी सिंगापूर किती महत्त्वाचे आहेसिंगापूर गेल्या ७ वर्षांपासून भारतातील सर्वात मोठा एफडीआय गुंतवणूकदार आहे, दोन्ही देशांमधील एकूण गुंतवणूक सुमारे १७० अब्ज डॉलर्स आहे. २००४-०५ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार ६.७ अब्ज डॉलर्स होता, जो २०२४-२५ मध्ये वाढून ३५ अब्ज डॉलर्स झाला. सिंगापूर हा भारताला आसियान देशांशी जोडणारा पूल आहे. भारत आणि सिंगापूरने लवकरच सीईसीए (व्यापक आर्थिक सहकार्य करार) आणि एआयटीआयजीए (आसियान-भारत वस्तू व्यापार करार) यांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :singaporeसिंगापूरIndiaभारतbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प