राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी देशाची सुरक्षितता आणि सांस्कृतिक अस्तित्वाच्या मुद्यांवर उत्तराखंड येथील संघ मुख्यालयात झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात मोठे भाष्य केले आहे. त्यांनी इस्रायलचे उदाहरण देत, भारताने आपल्या आंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आव्हानांचा समर्थपणे सामना करणे आवश्यकता असल्याचे मत व्यवक्त केले आहे. यावेळी त्यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
धर्मांतरणाच्या वाढत्या प्रकारांवर तीव्र चिंता व्यक्त करत जोशी यांनी, धर्मांतरणावर संपूर्ण बंदी घालायला हवी, असे आवाहन केले आहे. तसेच, समाजातील प्रत्येक घटकाने या दिशेने संकल्प करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.
भैयाजी म्हणाले, "अंतर्गत आणि बाह्य संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी भारताने 'स्वावलंबी, सशक्त आणि सजग' राष्ट्र बनेणे आवश्यक आहे. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि परदेशातील भारतीय नागरिकही देशाच्या संस्कृतीमुळे अभिमानास्पद अनुभव घेत आहेत.
...तरच समाजाचा समग्र आणि संतुलित विकास साधता येईल -स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत भाय्याजी म्हणाले, आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे आणि या स्वातंत्र्याचे पावित्र्य राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, देशाचा विकास केवळ भौतिक प्रगती किंवा पायाभूत सुविधांच्या बांधणीपुरताच मर्यादित नाही, तर मानसिक, सांस्कृतिक आणि रचनात्मक बांधणी यावरही भर देणे गरजेचे आहे, तरच समाजाचा समग्र आणि संतुलित विकास साधता येईल.
यावेळी व्यासपीठावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, संघ प्रचारक डॉ. शैलेंद्र, संजय आणि धनंजय उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पवन शर्मा यांनी केले.
Web Summary : RSS leader Bhaiyyaji Joshi urges India to learn from Israel regarding internal and external security. He advocated for a complete ban on religious conversions for national harmony and holistic development. He emphasized self-reliance and cultural preservation.
Web Summary : आरएसएस नेता भैयाजी जोशी ने भारत से आंतरिक और बाहरी सुरक्षा के संबंध में इजरायल से सीखने का आग्रह किया। उन्होंने राष्ट्रीय सद्भाव और समग्र विकास के लिए धर्मांतरण पर पूर्ण प्रतिबंध की वकालत की। उन्होंने आत्मनिर्भरता और सांस्कृतिक संरक्षण पर जोर दिया।