शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
8
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
9
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
10
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
11
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
12
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
13
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
14
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
15
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
16
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
17
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
18
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
19
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
20
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला

भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 06:50 IST

व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे बोलताना अदानी म्हणाले की, विदेशातील लोक काय बोलतात यावर भारताने आता अवलंबून राहू नये. मौन म्हणजे विनम्रता नव्हे, तर ती शरणागती आहे.

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालाचा एखाद्या हत्यारासारखा वापर झाला. त्यामुळे अदानी समूहाचे सुमारे ८८ हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य संपुष्टात आले. ही घटना साऱ्या देशासाठी डोळे उघडणारी ठरली असे अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले. या अहवालाचा  वापर करून अदानी समूहावर अतिशय नियोजनबद्ध रीतीने हल्ले चढविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे बोलताना अदानी म्हणाले की, विदेशातील लोक काय बोलतात यावर भारताने आता अवलंबून राहू नये. मौन म्हणजे विनम्रता नव्हे, तर ती शरणागती आहे. गांधी आणि स्लमडॉग मिलियनेअरसारख्या चित्रपटांचा दाखला देत अदानी म्हणाले, भारताच्या या कथा पाश्चात्त्यांनी त्यांच्या नजरेतून सांगितल्या. त्यामुळे यापुढे आपण कोण आहोत हे स्वत:च सांगितले नाही, तर इतरजण आपल्याबद्दलची कथा त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतील. 

भारताने चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्वतःची कहाणी व स्वतःचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला पाहिजे. भारताने मनात अहंकारभाव न ठेवता प्रामाणिकपणे तसेच कोणताही प्रचारकी थाट न बाळगता स्वत:ची कहाणी सर्वांना सांगितली पाहिजे. 

‘अमेरिकी चित्रपट देशाच्या प्रभावाची कथा सांगतात’अदानी म्हणाले की, अमेरिकी चित्रपट त्यांच्या राष्ट्राभिमानाची, सैन्याची, व्यापाराची आणि जगभरातील प्रभावाची कथा सांगतात. स्वतःची कहाणी प्रभावीरीत्या सांगणारा देशच जगाचे नेतृत्व करतो. विविध चित्रपटांतून अमेरिकेने आपले सैन्य, विचारसरणीला यांचे दर्शन जगाला घडविले. त्य़ाप्रमाणे भारतानेही जगात स्वतःची सर्जनशील ओळख निर्माण केली पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : India must effectively tell its story to the world: Adani

Web Summary : Gautam Adani urges India to share its narrative globally through film and technology. He highlights the Hindenburg report's impact and emphasizes the need to present India's perspective authentically, without arrogance, mirroring America's impactful storytelling through cinema.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय