शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

भारताने मालदीवला विमानाने पाठविले पाणी

By admin | Updated: December 6, 2014 00:00 IST

जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने मालदीवच्या राजधानी मालेत तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली

माले/नवी दिल्ली : जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने मालदीवच्या राजधानी मालेत तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली असून, भारताने तेथील लाखाहून अधिक लोकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी आज हवाई दलाच्या विमानासह नौदलाच्या जहाजाद्वारे पाणी पाठविले. या संकटावर मालदीवचे नागरिक आणि सरकारला संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले आहे, असे मालेतील भारतीय उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. उभय देशांतील मैत्रीपूर्ण, घनिष्ठ आणि मजबूत संबंध लक्षात घेऊन भारताने मालदीवच्या पाणी पाठविण्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्परतेने पाणी पाठविले. मालदीवचे संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षामंत्री कर्नल (निवृत्त) मोहंमद नाझीम यांनी भारतीय विमानाचे स्वागत केले. भारताने तातडीने दिलेल्या मदतीबद्दल संरक्षणमंत्री नाझीम यांनी भारताचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. माले जल आणि मलनिस्सारण कंपनीच्या एका जनरेटर कंट्रोल पॅनलला ४ डिसेंबर रोजी आग लागली होती. या आगीमुळे शुद्धीकरण प्रकल्पाच्या जनरेटरची केबल खाक होऊन पाणीपुरवठा ठप्प झाला. मालेत सध्या केवळ टाक्या आणि हौदांमध्ये साठवून ठेवलेले पाणि उपलब्ध असून ते दर १२ तासाला एकदा पुरविण्यात येत आहे. हे शहर हिंद महासागरातील सखल बेटावर वसलेले असून येथे एकही नैसर्गिक जलस्रोत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना संपूर्णपणे प्रक्रिया केलेल्या समुद्रातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. (लोकमत न्यूज नेटवर्क)