CoronaVirus News: देशासाठी पॉझिटिव्ह बातमी; सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडलं

By कुणाल गवाणकर | Published: December 27, 2020 11:04 AM2020-12-27T11:04:04+5:302020-12-27T11:11:14+5:30

CoronaVirus News: देशाच्या सर्व राज्यांमधील रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे

India Sees Lowest Daily Rise In Coronavirus Cases In Nearly Six Months | CoronaVirus News: देशासाठी पॉझिटिव्ह बातमी; सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडलं

CoronaVirus News: देशासाठी पॉझिटिव्ह बातमी; सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडलं

Next

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि अधिक धोकादायक स्ट्रेन सापडल्यानं जगाची चिंता वाढली. गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून बरेच भारतीय मायदेशी परतल्यानं धोका वाढला आहे. त्यामुळे ब्रिटनहून माघारी परतलेल्यांचा शोध सुरू आहे. नव्या स्ट्रेनमुळे काळजी वाढली असताना देशाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. 

काल दिवसभरात देशात १८ हजार ७३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १ जुलैपासून प्रथमच देशात इतक्या कमी संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात २७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ४७ हजार ६२२ वर पोहोचली. देशात आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला २ लाख ७८ हजार ६९० जणांवर उपचार सुरू आहे.

देशात सर्वाधित कोरोना रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १९ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ८५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली आणि केरळला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व राज्यांमधील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे. 
 

Web Title: India Sees Lowest Daily Rise In Coronavirus Cases In Nearly Six Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.