शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबाला विमानातून उतरवणाऱ्या ब्रिटिश एअरवेजकडे मागवणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 13:58 IST

नवी दिल्ली- भारतीय अधिकाऱ्याला विमानातून उतरवणाच्या घटनेची नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. ब्रिटिश एअरवेजने भारतीय अधिकाऱ्यास व त्याच्या कुटुंबाला 23 जुलै रोजी विमानातून बाहेर काढले होते. यासंदर्भात प्रभू यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये प्रभू म्हणतात, '' मी या प्रकरणात ब्रिटिश एअरवेजकडून सखोल अहवाल मागवण्याचे आदेश ...

नवी दिल्ली- भारतीय अधिकाऱ्याला विमानातून उतरवणाच्या घटनेची नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. ब्रिटिश एअरवेजने भारतीय अधिकाऱ्यास व त्याच्या कुटुंबाला 23 जुलै रोजी विमानातून बाहेर काढले होते. यासंदर्भात प्रभू यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये प्रभू म्हणतात, '' मी या प्रकरणात ब्रिटिश एअरवेजकडून सखोल अहवाल मागवण्याचे आदेश डीजीसीएला दिले आहेत.''

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील सहसचिव पदावर कार्यरत असणाऱ्या ए.पी.पाठक यांनी ब्रिटिश एअरवेजने आपल्याला वंशभेदाची वागणूक देऊन विमानाबाहेर काढले अशी तक्रार नागरी उड्डाण मंत्रालय आणि परराष्ट्र विभागाकडे केली आहे. या घटनेबाबत माहिती देताना पाठक म्हणाले, 'आमचे कुटुंब लंडन ते बर्लिन असा ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करत होते. आम्ही प्रवास करत असताना आमचा तीन वर्षांचा मुलगा रडू लागला, फ्लाइट अटेंडंटने त्याला थांबायला सांगितले आणि जर रडणे थांबवले नाही तर विमानातून उतरवू अशी धमकी दिली. काहीवेळ तो शांत झालेला नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला विमानातून उतरवले गेले.'

ते पुढे म्हणाले, माझ्या मुलाची जागा खिडकीशेजारी होती. त्याला शांत करण्यासाठी तेथे माझी पत्नी बसली होती. तरीही तेथे जाऊन माझ्यामुलाला अटेंडंटने खडसावले. विमान धावपट्टीकडे जाऊ लागल्यावर कर्मचाऱ्यांपैकी एकाने अपशब्द वापरुन जर तू शांत राहिला नाहीस तर खिडकीतून बाहेर फेकेन अशी धमकी दिली व नंतर आम्हाला उतरवण्यात आले. यासंदर्भात तक्रार करुनही ब्रिटिश एअरवेजच्या व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही.  यासर्व प्रकारामुळे पाठक यांना लंडनमध्येच एक रात्र राहावे लागले आणि बर्लिनला जाण्यासाठी खर्च करावा लागला. 

टॅग्स :Airportविमानतळairplaneविमानministerमंत्री