शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात इंधनासाठी मारामारी, पण भारताला रशियाच्या मैत्रीचा मोठ फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 17:00 IST

अमेरिकेचा दबाव झुगारुन भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरू ठेवली आहे.

India-Russia : सध्या जगभरातील देशांना इंधनासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. रशियाकडून तेल घेऊ नये, यासाठी अमेरिका आधीच दबाव आणत आहे. युरोपसह इतर अनेक देश अमेरिकेच्या दबावाला बळी पडत आहेत. पण या दबावातही भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे आपल्याला स्वस्त तेल मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केले आहे.

रशियन मीडियानुसार, पाश्चात्य देशांनी रशियन तेलावर विविध निर्बंध लादले होते, त्यामुळे भारताने मोठ्या सवलतीत तेल आयात केले. आकडेवारी दर्शवते की, रशिया आयातीच्या बाबतीत भारताचा चौथा सर्वात मोठा भागीदार बनला आहे. भारताने 37.31 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आयात केली आहे. ही वार्षिक 384 टक्के वाढ आहे.

भारताकडून निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 10 महिन्यांच्या आर्थिक कालावधीत भारताची निर्यात $78.58 अब्ज होती. गेल्या वर्षी ते 50.77 अब्ज डॉलर होती. तेल आयातीच्या बाबतीत भारत सरकारने अशी मुत्सद्देगिरी स्वीकारली आहे, ज्यामुळे संकटकाळातही भारतीयांना स्वस्त इंधन मिळत आहे. विशेष म्हणजे, तेल आयातीच्या बाबतीत भारत हा तिसरा सर्वात मोठा देश आहे.

अमेरिकेसमोर भारत वरचडरशियन तेलाच्या आयातीला अमेरिका विरोध करत होती, पण काही दिवसांपूर्वी भारतावर कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील सहायक सचिव (युरोपियन आणि युरेशियन व्यवहार) कॅरेन डॉनफ्रीड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही भारतावर कोणतेही निर्बंध लादणार नाही. भारतासोबतचे आमचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. युक्रेनला त्याच्या बाजूने मानवतावादी मदत देण्यात आल्याच्या भारताच्या पावलाचेही आम्ही स्वागत करतो. भारताने ज्या प्रकारे रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचे आवाहन केले, त्या विधानाचेही स्वागत करायला हवे. 

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाCrude Oilखनिज तेलAmericaअमेरिका