शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी महासागरातल्या चीनच्या वाढत्या घुसखोरीनं भारताला धोका- नौदल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 08:03 IST

गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरात चीनची घुसखोरी वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी चीनबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय लष्कराला चीनला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) इतर विभागांत मोठ्या प्रमाणात नौदलाचं साहित्य पाठवत आहे. त्यावर भारताला नजर ठेवणे आवश्यक आहे. चीनच्या मंत्रालयानं सैन्याच्या विकासासाठी नव्या युगातील चीनची राष्ट्रीय सुरक्षा या मथळ्याखाली एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. यात वर्ष 2012 ते 2017पर्यंत चीनच्या संरक्षण क्षेत्रातील खर्चात सरासरी 9.42 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे.आफ्रिकेच्या हॉर्नमधल्या जिबुतीमध्ये ओव्हरसीज बेस स्थापण करणं आणि कराचीमधल्या नौसैनिकांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबरोबरच चीनच्या हिंदी महासागरात होत असलेल्या घुसखोरीला नजरअंदाज करणं भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. चीननं या हिंदी महासागरालगतच्या क्षेत्रात सहा ते आठ युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे भारतानं सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्याला चीनच्या हालचालींवर अतिशय काळजीपूर्वक नजर ठेवावी लागणार आहे. चीननं काढलेली फक्त श्वेतपत्रिका नसून ग्लोबल पॉवर बनण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल आहे. त्यामुळेच ते नौसेनेला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा करत आहेत. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या बजेटमधून त्याला उत्तर देता येऊ शकतं का हे पाहणं गरजेचं आहे.  

  • नौसेनेला मोठ्या प्रमाणात निधी पुरवणं गरजेचं

नौदलाला सक्षण करण्यासाठी मोठ्या निधीच्या तरतुदीची गरज आहे. यावेळी नौदल प्रमुखांनी इतर आधुनिकीकरण योजनांसह स्वदेशी विमानवाहू युद्धनौकांचीही माहिती दिली. भारतानंसुद्धा 65,000 टन वजनाची युद्धनौका तयार केली आहे. कॅटोबार (सीएटीओबीएआर) ही एक अशी प्रणाली आहे, जिचा वापर एअरक्राफ्ट करियरमधल्या विमानाच्या वापरासंबंधी होतो. सध्या भारताकडे 140 युद्धनौका आणि 220 एअरक्राफ्ट आहेत. परंतु यात निवृत्त होणाऱ्या अनेक युद्धनौका आहेत. नौसेनेजवळ 2030पर्यंत 212 युद्धनौका आणि 458 एअरक्राफ्ट असणं गरजेचं असल्यानं मोठ्या निधीची तरतूद करणं आवश्यक असल्याचंही नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह म्हणाले आहेत. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग