शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा भारतानं चीनसाठी नाकारली होती सुरक्षा परिषदेची ऑफर; आता होईल का स्थायी सदस्य? बायडेन यांनी केलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 20:19 IST

परराष्ट्र विषयक धोरण तज्ज्ञांच्या मते, भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. यापूर्वी भारताने ही संधी गमावलेली आहे...

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन G20 परिषदेसाठी भारतात आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताच्या कायम सदस्यत्वासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे बायडेन यांनी सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला समर्थन दिले आहे. असे असताना, परराष्ट्र विषयक धोरण तज्ज्ञांच्या मते, भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. यापूर्वी भारताने ही संधी गमावलेली आहे.

भारताला मिळाली होती ऑफर -भारताला 1950 च्या दशकात अमेरिकेकडून सुरक्षा परिषदेत  स्‍थायी सदस्‍यत्वाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते भारताचे तत्‍कालीन पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी ही ऑफर नाकारली होती. तज्ज्ञांचा दावा आहे की, की नेहरूंनी चीनला प्राधान्य दिले आणि आज चीन सुरक्षा परिषदेचा स्‍थायी सदस्‍य आहे. 

अमेरिकेने भारताला मदतीच्या उद्देशाने ऑगस्ट 1950 मध्ये  सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्‍यत्वाची ऑफर दिली होती. त्यावेळी नेहरूंनी पत्र लिहून सांगितले होते की, भारताने सुरक्षा परिषदेत चीनची जागा घ्यायला हवी, असे अमेरिकेकडून सुचविले गेले आहे. पण भारत निश्चितपणे हे स्वीकारू शकत नाही. हा प्रस्ताव स्वीकारल्यास चीनसोबतचे मतभेद वाढतील. असे त्यांना वाटत होते.

काय म्हणाले होते ओबामा? -यापूर्वी 2011 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्‍ट्रपती बराक ओबामा पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा "आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, जेव्हा भारत संयुक्त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असेल," असे ओबामा यांनी भारताच्या संसदेसमोर म्हटले होते.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघJoe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन