शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एफडीआयमध्ये भारत जगात नवव्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 01:01 IST

संयुक्त राष्ट्रांचा अहवालच देशातील गुंतवणूक वाढती राहण्याचा वर्तविला अंदाज

संयुक्त राष्ट्रे : सन २०१९ मध्ये भारतात ५१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली असून, भारताने जगात नववा क्रमांक गाठला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका व्यापारविषयक संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या नंतरही भारतीय अर्थव्यवस्था ही वाढती राहण्याचा अंदाज असल्याने गुंतवणूक वाढत राहण्याचा होराही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्स ऑन ट्रेड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने विविध देशांमधील थेट परकीय गुंतवणुकीबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल तयार केला असून, त्यामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.आशिया खंडात भारत हा थेट परकीय गुंतवणुकीत अव्वल स्थानी राहिला आहे. सन २०१९मध्ये आशियात १.५४ ट्रिलीयन डॉलरची गुंतवणूक झाली आहे. चालू वर्षात यामध्ये ४० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. असे झाल्यास सन २००५ नंतर प्रथमच थेट परकीय गुंतवणूक ही १ ट्रिलियन डॉलरच्या खाली जाऊ शकेल.दक्षिण आशियातील विविध देशांमधून परकीय गुंतवणूक भारतामध्ये वळण्याचे प्रमाण सहा टक्के एवढे झाले आहे. असे असले तरी या देशांमध्ये एकूण जागतिक गुंतवणुकीपैकी १ टक्का गुंतवणूक होताना दिसत आहे. आगामी वर्षात भारतामधील गुंतवणूक कमी होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना बसलेल्या फटक्यामुळे चालू वर्षात थेट परकीय गुंतवणूक कमी होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.४२ अब्ज डॉलरने वाढली गुंतवणूकभारतामध्ये २०१९ या वर्षात ५१ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, त्या आधीच्या वर्षापेक्षा त्यामध्ये ४२ अब्ज डॉलरची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीत जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत १२व्या स्थानी होता. यावर्षी त्याने नवव्या स्थानावर उडी घेतली आहे. डिजिटल अर्थव्यवस्था आणि रिअल इस्टेट या दोन क्षेत्रांमध्ये भारतात मध्य मुदतीसाठी मोठी गुंतवणूक झालेली दिसून येत आहे.

टॅग्स :FDIपरकीय गुंतवणूकunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ