शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवी दिल्लीला मिळणार अमेरिकेचं 'रक्षा कवच', जवळपासही फिरकणार नाही शत्रूंची मिसाइल अन् ड्रोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 11:25 IST

वॉशिंग्टन आणि मॉस्कोसारखेच केंद्रातलं मोदी सरकार देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला अभेद्य अशी सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

नवी दिल्लीः वॉशिंग्टन आणि मॉस्कोसारखेच केंद्रातलं मोदी सरकार देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला अभेद्य अशी सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठीच भारत अमेरिकेकडून नॅशनल एडवान्स्ड सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम- II (NASAMS-II) खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम राजधानी दिल्लीचं संरक्षण करणार आहे. ही सिस्टीम दिल्लीत तैनात केल्यानंतर शत्रूला मिसाइल, ड्रोन आणि विमानानं हल्ला करणं शक्य होणार नाही. जरी हल्ला झाला, तरीही तो या यंत्रणेच्या माध्यमातून लागलीच निष्क्रिय करता येणार आहे.  टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं दिल्लीच्या चारही बाजूंना एअर मिसाइल सिस्टीमच्या कवचाचं संरक्षण पुरवण्याचं निश्चित केलं आहे. डीआरडीओ स्वतःची बॅलिस्टिक मिसाइल संरक्षण(BMD) प्रणाली विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच NASAMS ही एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम अमेरिकेकडून घेण्यासाठी भारतानं ठरवलं आहे. याचा देशातीच राजधानी असलेल्या दिल्लीला मोठा फायदा होणार असून, ती सुरक्षित केली जाणार आहे. बॅलिस्टिक मिसाइल संरक्षण(BMD) प्रणालीच्या माध्यमातून पृथ्वीच्या वायुमंडळ आणि बाहेरून मिसाइलचं आक्रमण झाल्यास ट्रॅक सिस्टीमच्या माध्यमातून ती नष्ट करता येणार आहे. अमेरिकेकडून घेण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक प्रणालीमुळे 9/11 सारख्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करता येणार आहे. NASAMSची हवेत मारा करून शत्रूच्या मिसाइलला टार्गेट करण्याची क्षमता जबरदस्त आहे.तसेच या यंत्रणेमध्ये बंदूक प्रणालीचाही अंतर्भाव करण्यात आल्यानं ही एक अत्याधुनिक प्रणाली समजली जाते. इमारतीच्या जवळूनही या प्रणालीच्या माध्यमातून शत्रूवर निशाणा साधता येऊ शकतो. NASAMS-IIमुळे जुनी सुरक्षा व्यवस्था बदलून अत्याधुनिक होणार आहे. मोदी सरकारच्या तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील डीएसहीनं अमेरिकेकडून 1 अब्ज डॉलरमध्ये 'नॅशनल एडवांस्ड सर्फेस-टू-एयर मिसाइल सिस्टम-2' खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली होती. अमेरिकेकडून घेण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक प्रणालीतून राष्ट्रपती भवन, संसद, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकला सुरक्षा देण्यात येणार आहे.