शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:03 IST

India Pakistan War : भारतीय लष्काराने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले.

India Pakistan War ( Marathi News ) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन बदला घेतला, या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात मुरीदके येथील दहशवाद्यांचाही खात्मा झाला. येथील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करही उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. 

हल्ल्यानंतर, मुरीदके येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण हाफिज अब्दुल रौफ याने केले, त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर, पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी तो स्थानिक धर्मगुरू असल्याचे सांगत या प्रकरणापासून हात झटकले. मात्र, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून पाकिस्तानी लष्कर खोटे बोलत असल्याचे उघड झाले आहे.

...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार

पत्रकार तल्हा सिद्दीकी यांनी अब्दुल रौफचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्ट त्यांनी एक कॅप्शन दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'आपल्या शिष्याच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करणारे हाफिज अब्दुल रौफ काश्मीरमधील दहशतवादाचे गौरव करत आहे", हा व्हिडीओ पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगच्या सोशल मीडिया पेजवर  शेअर केला. पाकिस्तानी सैन्य अजूनही रौफला स्थानिक धर्मगुरू म्हणेल का? , असा सवाल उपस्थित होत आहे. 

व्हिडीओमध्ये काय आहे?

अब्दुल रौफ याच्या  शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. मुस्लिमांना उद्देशून तो म्हणत आहे की, 'आम्ही पाहिले आहे की अमेरिका किती शक्तिशाली आहे. आपण रशियन योद्ध्यांना अफगाणिस्तानातून पळून जाताना देखील पाहिले आहे. १९६५ मध्ये भारताची वाईट अवस्था आपण पाहिली आहे. काश्मीरमध्ये आपल्या दोन मुजाहिदीनना दोन हजार लोकांशी लढताना पाहिले आहे. आमच्या सैनिकांनी श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला आहे.'

भारतासह जगातील अनेक देश दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहेत, पण पाकिस्तान आपल्या भूमीवर कोणत्याही दहशतवादी कारवाया होत असल्याचे नाकारत आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर या प्रकरणात पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. अब्दुल रौफ सारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात सन्मानित केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवान