शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:55 IST

India-Pakistan: 'आम्ही दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीचे पालन करतो. आमच्या मित्र राष्ट्रांनीही हे समजून घ्यावे.'

India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. आधी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. त्यानंतर सरकार विविध देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणत आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी ब्रिटिश परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी झालेल्या बैठकीत म्हणाले की, भारत कधीही दहशतवादी आणि पीडितांना एक माणणार नाही. 

गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ४ दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत डॉ. एस जयशंकर यांचे हे विधान महत्वाचे ठरते.

डेव्हिड लॅमी पीएम मोदींना भेट घेतलेब्रिटिश परराष्ट्र सचिव लॅमी काल सकाळी दिल्लीत पोहोचले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, तर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय कारवाईची गरज असल्याचे म्हटले. तसेच, सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत ब्रिटनने दिलेल्या पाठिंब्याचे मी कौतुकही केले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि दोन्ही देशांमधील दुहेरी योगदान करार (डीसीसी) च्या अलिकडच्या निष्कर्षाला "रणनीतिक टप्पा" म्हटले आहे. यामुळे विविध क्षेत्रात भागीदारीच्या शक्यता उघडतील. पंतप्रधान मोदींनी ब्रिटिश समकक्ष पंतप्रधान केयर स्टारमर यांना शुभेच्छा दिल्या आणि शक्य तितक्या लवकर भारताला भेट देण्याचे आमंत्रणदेखील दिले.

एफटीए दोन्ही देशांसाठी एक नवीन सुरुवातपरराष्ट्र मंत्री लॅमी यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला पाठिंबा दिल्याबद्दल ब्रिटनचे आभार मानले. जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आम्ही दहशतवादाविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'चे धोरण पाळतो आणि आशा करतो की, आमचे मित्र राष्ट्र हे चांगल्या प्रकारे समजून घेतील. जयशंकर यांनी अलिकडेच झालेल्या भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (एफटीए) आणि दुहेरी योगदान कराराचेही मैलाचे दगड म्हणून वर्णन केले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरS. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदी