जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने 'ऑपरेशन सिंदूर' करून प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला. पाकिस्ताननेही भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या कारवाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताने अलिकडेच पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? यामागील कारण केवळ लष्करी नाही, तर धोरणात्मक देखील आहे.
नूर खान एअरबेसइस्लामाबादजवळील नूर खान एअरबेस हा पाकिस्तानमधील सर्वात हाय-प्रोफाइल एअरबेसपैकी एक आहे. याच ठिकाणावरून पाकिस्तान हवाई दलाच्या विशेष कारवाया होतात. शिवाय राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उड्डाणांसाठीही हे तळ मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेला हल्ला हा पाकिस्तानसाठी थेट संदेश आहे, जर सीमेपलीकडून काही हालचाल झाली तर भारतही त्याला प्रत्युत्तर देणार.
रफीकी एअरबेस रफीकी हवाई तळ हे पाकिस्तान हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचा लढाऊ विमान तळ आहे. या ठिकाणांहून एफ-१६ आणि जेएफ-१७ सारखी लढाऊ विमाने उड्डाण करतात.
मुरीद एअरबेस पंजाब प्रांतात स्थित मुरीद हवाई तळ हा पाकिस्तानच्या हवाई संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुरीद हे तळ आधुनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणालींनी सुसज्ज आहे. चीनच्या सहकायनि पाकिस्तानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी हे तळ एक चाचणी बिंदू असल्याचे म्हटले जाते. भारताने या ठिकाणावर निशाणा साधणे हे दर्शवते की, ते पाकिस्तानच्या उच्च-तंत्रज्ञानाच्या लष्करी तयारीलाही आव्हान देण्यास सक्षम आहे.