शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद! सीमेपलीकडून येणाऱ्या 'मेड इन चायना' ड्रोनमुळे BSF चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:20 IST

India Pakistan News: बहुतांश ड्रोन पाकिस्तानमधील लाहोरमधून आणि भारतातील अमृतसरमध्ये पाठवले जात आहेत.

India Pakistan News:पाकिस्तानातून भारतात ड्रोनद्वारे ड्रोन, शस्त्रे, दारुगोळा आणि इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व गोष्टी भारतीय सीमा सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) मोठे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे, बीएसएफने जप्त केलेले सर्व ड्रोन चीनमध्ये बनवलेले असल्याचे दिसून आले आहे. यातील बहुतांश ड्रोन पाकिस्तानच्या लाहोर जिल्ह्यातून आले असून, ते पंजाबमधील अमृतसरच्या दिशेने जात होते. गेल्या काही वर्षांत जमिनीवरुन होणारी तस्करी जवळपास संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची बहुतांश तस्करी होऊ लागली आहे.

या शहरांमधून ड्रोन पाठवले जाताहेतजानेवारी 2025 मध्ये बीएसएफने 63 ड्रोन ताब्यात घेतले होते. तर, 2024 मध्ये बीएसएफने 260 ड्रोन जप्त करून ते तपासासाठी पाठवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रोनमुळे सर्वाधिक प्रभावित राज्ये पंजाब आणि राजस्थान आहेत. पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, फिरोजपूर, अबोहर आणि राजस्थानमधील गंगानगर सर्वात जास्त प्रभावित आहे. पाकिस्तानातील लाहोर, नारोवाल आणि कसूर जिल्ह्यातून हे ड्रोन पाठवले जात आहेत.

बीएसएफने 2024 मध्ये सोडलेल्या ड्रोनच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, अमृतसर, गुरुदासपूर आणि फिरोजपूरसह सीमावर्ती भागात 260 ड्रोन माल टाकण्यासाठी आले होते. या ड्रोनचे लॉन्च पॅड पाकिस्तानी रेंजर्सच्या तळांजवळ असल्याचेही तपासात समोर आले आहे. 

ड्रोनचा सहज माग काढता येत नाहीगेल्या काही वर्षांत ड्रग्स, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी करणारे ड्रोन हे पंजाबमधील सुरक्षेला मोठा धोका बनले आहेत. 2023 मध्ये बीएसएफने 110 ड्रोन जप्त केले, तर 2024 मध्ये 260 ड्रोन जप्त केले. पंजाबमध्ये सापडलेल्या 55 टक्के ड्रोन सुरक्षा दलांनी अक्षम केले आहेत. पाकिस्तानकडून पाठवल्या जाणाऱ्या ड्रोनची संख्या वाढण्याबरोबरच त्यांचा आकारही लहान झाला आहे. हे ड्रोन एक किलोमीटर उंचीपर्यंत उडतात आणि सहज पकडले जात नाहीत.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादBSFसीमा सुरक्षा दल